Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

*धुळे जिल्ह्यातील अपघाताचे संकट संपता, संपेना...* *दोंडाईचा के. एस. स्टोरेजला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही पण शेतकऱ्यांचे वीसकोटीचे नुकसान..*



दोंडाईचा प्रतिनिधी  काल रात्री सव्वा आठ वाजता दोंडाईचा येथील किशोर फ्रुट्स अँड कोल्ड स्टोरेजला अचानक भीषण लागली. कमी वेळात आग एवढी मोठ्या प्रमाणात पसरली की, गावाच्या दुसर्‍या टोकावरून आगीचे गोळे स्पष्ट दिसत होते. सुदैवाने पहाटेपर्यंत कोणाचीही जीवितहानी होण्याची वार्ता नव्हती. पण कोल्ड स्टोरेज मालकाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे कोटी रुपयांचे  नुकसान झाले असुन, धुळे जिल्हावरील अपघाताचे संकट संपता, संपेना अशीच ओरड,भावना जनतेतून निघत आहे.

दोंडाईचा कोल्ड स्टोरेजची स्थापना हस्ती बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय कांतीलालजी हस्तीमलजी जैन यांच्या कल्पनेतून सन १९९८ मध्ये म्हणजे बावीस वर्षापूर्वी साकारण्यात आली होती. त्यावेळी स्व. कांतीलाल काका यांना आपल्या शेतकरी राजा, गाव व तालुक्याची परिस्थिती चांगली प्रकारे ग्यात होती. शेतकरी हा मोठ्या मुश्किलीने शेतात बियाणे, खत, फवारणी करत वेळप्रसंगी सावकाराचे कर्ज करत पीक घेतो. आणि पीक हाती आल्यावर त्याच्या पिकाला पाहिजे तो मोबदला मिळत नाही. कारण त्या पिकाला काही दिवस साठवून ठेवून, योग्य वेळी बाजारात आणण्यासाठी गोडाऊन नसते. म्हणून त्याच्या मालाला योग्य भाव भेटत नाही. म्हणुन शेतकरी अनेकवेळा आत्महत्या करण्यासारख्या कठीण गोष्टीकडे पाऊल उचलतो. म्हणून हे सर्व कुठे तरी थांबायला पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांन विषयी त्यांची ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेतकरी राजा जगला तरच आपल गाव, जिल्हा, राज्य, देश जगेल ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. म्हणून त्यांनी दोंडाईचा रस्त्यावरील मांडळ चौफुलीवरील किशोर फ्रुट्स अँड कोल्ड स्टोरेज नावाने शेतकर्‍यांच्या मालाला जीवदान देण्यासाठी सात हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्य असे वातानुकूलित स्टोरेज बांधले. त्यांच्या ह्या स्टोरेजला शेतकऱ्यांनी सुरूवातीला कमी पण नंतर हळू हळू चांगला जोरात प्रतीसाद दिला. शेतकर्‍यांना आपल्या मालाला दोन पैसे योग्य भाव मिळून, कोल्ड स्टोरेज चालवण्यामागे चांगला नफा दिसु लागला. मग स्व. कांतीलाल काकाजीनी आपल्या कोल्ड स्टोरेजच्या शाखा वाढविण्याचा विचार केला. त्यांच्या ह्या कामात मग त्यांना त्यांचे पुणे स्थाईक मोठे चिरंजीव मदनसेठ जैन, कैलास जैन, किशोर जैन व अशोक जैन यांची मोलाची साथ लाभली. त्यानंतर त्यांनी शहादा, नंदुरबार, जळगाव आदी ठिकाणी मोठ्या ऐसपैस शेतकर्‍यांना पुरवठेल अशा मोक्याच्या जागेवर कोल्ड स्टोरेज बांधले. आज स्व. काकाजी नंतर त्यांची धुरा वरील त्यांचे सुपूत्र पाहत आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार आख्खा खान्देशात नावारूपाला आलेल्या के. एस. कोल्ड स्टोरेजला लागलेली कालची आग खुप भयानक होती. तीची दाहकता आज सकाळपर्यंत लोकांना जाणवत होती. आग आज संध्याकाळपर्यंत आटोक्यात येईल असे जाणकारांचे म्हणणे होते. ह्या आगीत शेतकऱ्यांचे जवळपास अंदाजीत वीस ते पंचवीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात गहु, बाजरी, मिरची, जिरे, सफरचंद, मोसंबी यासह विविध कडधान्ये व फळे आदिचा समावेश आहे. 

स्टोरेज मालकांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान..

दोंडाईचा येथील जैन बंधुना कोल्ड स्टोरेज चालविण्याचा खान्देशात ऐवढा मोठा अनुभव असताना ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलीच कशी...? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहे. जर यांना कोल्ड स्टोरेज चालवण्याचा अनुभव होता व मागील काही वर्षांपूर्वी नंदुरबार येथील कोल्ड स्टोरेजला अशीच मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली. त्यावेळीही अनेक कोटींचे नुकसान झाले. त्यात  शेतकऱ्यांना किती नुकसान भरून मिळाले, हा मुद्याचा प्रश्न आहे..? का कोल्ड स्टोरेज मालकांचाच येथे कोटी रुपयांचा फायदा झाला हा ही कळीचा मुद्दा आहे. 

फायर ऑडिट दरवर्षी झाले का..? 
राज्यात अशाप्रकारच्या कोल्ड स्टोरेज व कारखान्यांमध्ये दरवर्षी फायर ऑडिट केले जाते. त्यात आगीमुळे काय, काय नुकसान होऊ शकते याचा अंदाज बांधला जातो. त्याठिकाणी आग विझवण्यासाठी पाण्याचा स्रोत, विहीर, वरपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी पाईप लाईन, अग्निशमन सुरक्षा अधिकारी यांची चोख नेमणूक केली जाते. हे सर्व ज्या कोल्ड स्टोरेज व कारखान्यात असेल, अशान्याच परवानगी दिली जाते. जर *"फायर ऑडिट"* झाले असेल तर आग लागायला काही कारण नव्हते. 

आग लागली का लावली...? हीच चर्चा गावात जास्त आहे. मागे  राज्यात कापसाच्या  जिनिंग, व कोल्ड स्टोरेजला आग लागण्याच्या घटना जास्त घडत होत्या. त्यामुळे सहाजिकच ह्या घटनेकडे त्या दुर्ष्टीने लोकांचे पाहणे लाजमी आहे. कारण त्यावेळी ही जिल्ह्यात ज्यांच्याकडे सहकारी बॅक आहे. त्याच्याकडेच कापसाच्या जिनिंग, व कोल्ड स्टोरेज चालवायची हिम्मत व्हायची व परवानाही मिळायचा. कारण त्यांना शेतकर्‍यांना सहज मालाची गॅरंटी देण्यासाठी बँकेची शाश्वती देता यायची, व ह्या बँकेच्या क्रेडीटच्या माध्यमातून त्यांना आग लागल्यावर करोडोचा विमा पास करता यायचा. आज सर्वाकडे आधुनिक कोल्ड स्टोरेज आहे. के. एस. स्टोरेजही खुप जुने होते. म्हणून विमा पास करण्याच्या उद्देशाने तर नाही आग लागली. कारण आग वरून लागली. जर आग लागायची होती तर खालून लागायला पाहिजे होती म्हणून येणाऱ्या काळात के. एस. कोल्ड स्टोरेज आधुनिक पद्धतीने उभे राहिले तर लोकांना आश्चर्य वाटायला नको

हस्ती बॅक व हस्ती पब्लिक स्कूल काटेकोरपणे चालविणाऱ्या कडून शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत दुर्लक्षपणा योग्य नाही गावात, जिल्ह्यात, खान्देशात, पुणे पर्यंत ज्यांचा सहकार क्षेत्रात गाजावाजा आहे, अशा जैन बंधुनी बँक आय. एस. ओ. प्रमाणीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. चुकीच्या व्यक्ती, चुकीचे कामे, डिफॉल्टर ग्राहक यांना वेळीच बाजूला केले. स्वतःही चुक करत नाही व दुसर्‍याची चुक पचवून घेत नाही. ऑन दि स्पॉट समोरच्या व्यक्तीला सर्व विषयात "डिसमिस" करून टाकतात. तसेच हस्ती पब्लिक स्कूलही खुप कमी वेळात जिल्ह्यात नावारूपाला आणली. शाळेत कार्यक्रम घेण्यापासून, रोज उठून प्रसिद्धीत राहण्यामध्ये मातब्बराच्या शाळांना मागे टाकुन दिले. शाळेत एक एक विद्यार्थीवर लक्ष असल्यापासून त्यांना काय शिकवले जाते, काय खायला मिळते, कोणता शिक्षक काय शिकवतो असे एक ना अनेक बारकावे ते आपल्या नजरेखालून जावू देत नाही. म्हणून के. एस. कोल्ड स्टोरेजला आग लागली हे अजुनही त्याच्या कर्मचार्‍यांना, शाळेतील शिक्षकांना, मित्र परिवार, गावातील कै. काकाजी व त्यांच्या परिवारावर श्रद्धेने प्रेम करणार्‍या लाखोंच्या गोतावळाला विश्वास बसत नाही आहे. परमेश्वर त्यांना हे आगीचे करोडो रुपयांच्या दुखा:तुन बाहेर पडायची हिम्मत द





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध