Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ सप्टेंबर, २०१९
चोपडा शहरात मोठ्या उत्साहात गणरायांचे आगमन, गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह,
चोपडा ,( प्रतिनिधी) विनोद निकम
चोपडा शहरात आज सकाळ पासून गणेश भक्तांनी शहरातील विविध मार्गाने सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्तेे यांनी गणेश मूर्तीचे वाजत गाजत मिरवणूक काढून संध्याकाळ पर्यंत गणरायाची मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी गणेश भक्तांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला.शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी व पालिकेतील गटनेते जीवन चौधरी यांनी त्यांच्या घरी गणेश मूर्तीची विधीवत स्थापना करून शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे ,शहराला कोणाची नजर लागू नये अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.तसेच आज शहरातील मेनरोड वरील दोन्ही बाजूंनी वाहतूक व्यवस्था पूर्ण पणे ठप्प झाली होती. त्यात वरून राजाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांची काहीवेळ धावपळ उडाली.यावेळी पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बारीक लक्ष ठेवत कडक बंदोबस्त ठेवला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा