Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

खलाणे चे माजी सरपंच विजय टाटीया यांना झोडपले







शिंदखेडा प्रतिनिधी :खलाणे येथील रहिवासी माजी सरपंच एका प्रख्यात वृत्तपत्राचे माजी संपादक विजय टाटिया यांना काल शिंदखेडयात जबर मारहाण करण्यात आली 
महिलांनी मारहाण केल्याने जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झालेला आहे विजय टाटिया यांना का मारहाण करण्यात आली यामागील गौडबंगाल काय याची खमंग चर्चा आता होऊ लागली आहे दरम्यान काल झालेल्या या घटनेमुळे शिंदखेडा पोलिसात दोन्ही गटांकडून गुन्हा दाखल केला असून विजय टाटिया यांच्यावर महिलांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकेकाळचे दक्ष पोलीस टाईम या वृत्तपत्राचे संपादक विजय हराकचंद  टाटिया या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील मूळचे रहिवाशी आहेत पत्रकारितेच्या जोरावर त्यांनी खलाणे येथील सरपंच पद उपभोगले आहे तालुक्यात व जिल्ह्यात त्यांची दडपशाही सुरू होती आज ती अखेर उघड झाली आहे या सौद्यात पैशाची देवाणघेवाण देखील झाल्याचे समजते यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे काल शिंदखेडा येथिल न्यायालयाच्या कामानिमित्त श्री टाटीया शिंदखेडा येथे आले असताना बाबूळदे येथील मूळचे रहिवाशी हल्ली मुक्काम धुळे विलास शिंदे यांच्या प्रॉपर्टी च्या वादावरून हे भांडण झाल्याचे समजते दरम्यान शिदखेळा येथील शिवाजी चौकात ते आले असताना विलास शिंदे यांच्या पत्नी सह बहिण व इतर महिलांनी त्यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली शिवाजी चौक ते बस स्टँड च्या पावेतो त्यांची मारहाण करीत कॉलर पकडीत धिंड काढली याप्रकरणी शिंदखेडा पोलीस सात विजय टाटिया यांनी फिर्याद दिली असून भाद वि  कलम 307 143 323 504 506 मुंबई पोलीस ऍक्ट कलम 37 चे उल्लंघन तर शिंदे कडून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत

1 टिप्पणी:

प्रसिद्ध