Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
वृंदावन प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम; बंदोबस्तावरील पोलिसांना दिले भोजन
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम जल्लोषात सुरू असलेले गणरायाचे विसर्जन, भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह, सगळीकडे गुलालची उधळण, ढोल ताशांचा दणदणाट....अशा परिस्थिती या आनंदावर विरजण पडू नये म्हणून पोलीस बांधवांचा पहारा...आपल्या खाण्या पिण्याचा विसर पडावा अशी ड्युटी....अशावेळी बंदोबस्तावर असलेल्या या पोलिस, होमगार्ड बंधू भगिनींना ताजे जेवण जागेवर मिळावे असा विचार करून येथील वृंदावन प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने अनोखा उपक्रम राबवला.
चोपडा शहरात पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन होत असते. सकाळी लवकर सुरू होणारी ही विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू असते. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते. आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकारी कर्मचारी आपल्या नियुक्त जागी कार्यरत असतात. या पोलिस, होमगार्ड, शीघ्र कृती दल, दंगा नियंत्रण पथक अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय करत वृंदावन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जागेवर जेवण नेऊन देत आम्ही तुमच्या सोबत आहोत हा भाव व्यक्त केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
याकामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र विसपुते यांच्यासह गोटूसेट जैन, जितेंद्र दीक्षित, अजय बारी, दिनेश साळुंके, राजेंद्र नेवे, रियाज बागवान, मुन्ना जैन, मनमोहनसिंह राजपुरोहित, कैलास मराठे, सुभाष अहिरराव, राजेंद्र जैन, सत्यनारायण महाराज, सौरभ नेवे, संदीप शिंपी, दीपक बागूल, राजू स्वामी, बाबा नेवे, दीपक चौधरी, महेंद्र जैन, उषा विसपुते, अलका बारी, रुपाली नेवे, बिना दीक्षित, ज्योती मराठे, रेखा साळुंके, ज्योती अहिराव, आरती अहिराव ,मनीषा जैन, दर्शना चौधरी , सचिव सविता विसपुते यांच्यासह प्रथमेश, नकुल, तेजस, राज, चिन्मय, मयूर, मिहीर, कृष्णा, राम या बालकांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा