Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९
ऋषीपांथा येथे ऋषीपंचमी निमित्य भाविकांची गर्दी ,हजारो महिलांनी केले शाही स्नान
प्रतिंनिधी बहाळ संतोष भोई ऋषिपंचमी निमित्ये महिला भाविकांची ऋषीपंथा येथे गर्दी झाली असून यावर्षी गिरणा नदीला पाणी नसल्यामुळे शाही स्नानासाठी येथे पाण्यासाठी टाक्या व पाण्याचे मोठे कुंडे बाधण्यात आले असल्याने महिलांनी त्याच शाही स्नानात समाधानी राहवे लागले आहे . व तसेच दोन दिवस अगोदर जोरदार पाऊस पडल्याने भवरी नदीला पाणी आले होते त्या पाण्यात शाही स्नान केले दोन वर्षापूर्वी याठिकाणी आत्री ऋषी ,वशिष्ट ऋषी ,जमद्न्नी ऋषी ,कश्यप ऋषी विश्वमित्रा ऋषी ,भारव्दाज ऋषी व गौतम ऋषी या सप्तऋषींची स्थापना करण्यात आली आहे व तसेच पाणी नसल्यामुळे भाविक अल्प प्रमाणात आले असले तरी पाचोरा ,धुळे ,भडगाव चाळीसगाव, कोळगाव, वाडे सह परिसरातील भाविकची उपस्थिती होती . भावरी व गिरणा नदीच्या सगमावर असलेले ऋषीपांथा हे तीर्थक्षेत्र असून या क्षेत्रावर साठ हजार ऋषींनी हाजारो वर्ष तपचर्या केली असल्याने या स्थानाला खूप महत्व प्राप्त झाले आहे .मुबलक पाणी नसल्याने महिला भाविकणी खंत व्यक्त केली . दरवर्षी थोड्या प्रमाणात गिरणा नदीला पाणी असायचे मात्र यावर्षी नदी कोरडी असल्याने भाविकांनी नाराजी व्येक्त केली . मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा