Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा नासिक उपसभापती श्री. बबनराव चौधरी यांना खान्देश भुषण पुरस्काराने सन्मानित




शिरपुरच्या (प्रतिनिधि) गौरव फाउन्डेशन व कुलश्री प्रतिष्ठान कडून खान्देश भुषण पुरस्कार वितरण सन्मान सोहळा सन 2019 चे आयोजन करण्यात आले होते. खान्देश भुषण पुरस्कार बबनराव चौधरी यांना आंतरराष्टीय ख्यातीप्राप्त तपस्वी शल्यचिकित्सक डाॅ. रविंद्रनाथ टोणगांवकर यांचा हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. शिरपुरचे उपनगराध्यक्ष श्री. भूपेशभाई पटेल  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रम दि. १५/९/२०१९ रोजी शंकर नाना मंगल कार्यलय शिरपुर येथे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणुन शिंदखेडाचे तहसिलदार सुदाम महाजन, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गौरव फाऊन्डेनचे अध्यक्ष मोहनदास भामरे, सचिव अॅड. जितेश जैन यांनी केले होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध