- अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी समिती नियुक्त
- ग्रामसेवक आता झाले पंचायत विकास अधिकारी
- ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हता पदवीधर
- ग्रामसेवकांना आता १ हजार ५०० रुपये प्रवासभत्ता मिळणार
Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९
ग्रामसेवकांचे आता नवे नांव पंचायत विकास अधिकारी
पंकज पाटील (उपसंपादक तरुण गर्जना)
ग्रामसेवकांच्या
मागण्या मान्य – २२ दिवसानंतर संप घेतला मागे.
ग्रामसेवक व
ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून आता ग्रामपंचायतीमध्ये पंचायत विकास
अधिकारी हे एकच पद निर्माण होणार .त्याच बरोबर दोन्ही पदामध्ये असलेली वेतन त्रूट
देखिल संपुष्टात येणार या सर्व मागण्या
मान्य झाल्यामुळे ग्रामसेवक संघटनेचे सुरु असलेले काम बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा युनियनचे राज्याध्यक्ष
एकनाथ ढाकणे यांनी केली.
ग्रामपंचायतीतील
अतिरिक्त कामे काढून घेण्यासाठी ठेवलेला विषय मार्गी लावण्यासाठी ग्रामविकास
विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गढीत करण्यात आली .
ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हता पदवीधर करण्यात आली असून त्यांच्यावर ४ जानेवारी
२०१७ च्या आदेशातील अनियमितता बाबत
फौजदारी गुन्हा दाखल बद्दलची फाईलही मंत्र्याना सादर झाली आहे.
ग्रामसेवकांनी
पंचायत समितीत जमा केलेल्या चाब्या ताब्यात घेतल्या असून तब्बल २२ दिवसानंतर
ग्रामपंचायतीचे कामकाज सुरु झाले .या २२ दिवसांत ग्रामपंचायतीतील सरपंचाना व
नागरिकांना ग्रामसेवकाची आठवण आली नाही व कुठेही ग्रामीण भागातून तक्रार पुढे आली
नाही ही बाब देखिल इतिहासात नोंद करण्यासारखी आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा