Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
कृषि विषयक उच्च शिक्षण घेऊन प्रगति साधावी - श्रीराम पाटिल
निंभोरा बु। ता रावेर प्रतिनिधी अजीज शेख प्रत्येक विद्यार्थ्यांने कृषि विषयक चांगला अभ्यासाचे उच्च शिक्षण घेऊन अधिकाधिक प्रगति साधावी आणि व्यवसायाभिमुख व्हावे असे प्रतिपादनप्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले
निंभोरा बु ता रावेर येथील कृषि तंत्र विद्यालयात शेती विषयक आधारित उद्योगावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतांना उधोजक श्रीराम पाटिल यांनी आपल्या आयुष्यातील घडामोडी आणि वाटचाल सांगून कोणतेही काम करण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. आपण करीत असलेल्या कामात अथवा व्यवसायात प्रामाणिकपणा व सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य एम टी बोंडे यांनी केले .याप्रसंगी श्रीराम फौंडेशन सचिव दिपक नगरे, मेक्रो विजन अकादमी रावेर चे सचिव स्वप्निल पाटिल ,कृषि विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे ,यांनीही मार्गदर्शन केले यावेळी सचिन महाले ,रविन्द्र महाले , विवेक बोंडे, जितेंद्र भावसार, धनराज बावस्कर ,मोहन भंगाळे,जितेंद्र कोळंबे , व विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार संदीप महाजन यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा