खासदार उन्मेष पाटील यांनी दाखवली हिरवी झेंडी
उमेद आभियानाने महिला सक्षमीकरणासाठी बळ — संपदा पाटील
चाळीसगाव प्रतिनिधी :महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिला प्रतिनिधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय महिला सक्षम मेळाव्यासाठी आज अकरा बसेस द्वारा औरंगाबाद कडे रवाना करण्यात झाल्या आहेत. खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील यांच्या शुभ हस्ते या वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी सभापती स्मितल बोरसे. उपसभापती संजय पाटील दिनेश बोरसे सहायक गट विकास अधिकारी अजित पवार ,पंचायत समिती सदस्य सुनील पाटील यांच्या उपस्थितीत या
बसेस औरंगाबाद कडे रवाना झाल्या आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात सिग्नल चौकात आज रात्री नऊ वाजता या सर्व बसेस ची विधिवत पूजन करून औरंगाबाद कडे रवाना करण्यात आल्यात. यावेळी संपदा पाटील म्हणाल्या की उमेद अभियान महिलांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी आगळावेगळे पाऊल आहे. महिला सक्षम झाली तर परिवार सक्षम होणार आहे परिवार सक्षम घर सक्षम , गाव सक्षम पर्यायाने तालुका सक्षम होणार आहे तालुका ,जिल्हा , राज्य आणि राज्य सक्षम तर भारत देश सक्षम होणार असल्याने महिलांचे आर्थिक सबलीकरण होणेसाठी महाराष्ट्र राज्याने ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवले आहे या अभियानासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे महिलांनी या पर्वणी चा आपल्या आर्थिक सक्षमीकरणसाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन यावेळी संपदा पाटील यांनी केले
याप्रसंगी वैशाली पाटील उदया पवार कविता पाटील चारुलता देसले ज्योति मगर वंदना पाटील सोनाली सोनवणे दुर्गा मोरे संगीता महाजन ज्योत्स्ना पाटील सविता पाटील सविता जिरेमाळी रेखा शेलार निर्मला मोरे मनिषा माळी बेबीताई मोरे गायत्री गुजर सोनाली पाटील रेखा पाटील सुलभा देशमुख प्रतिभा पाटील रोहिणी पाटील या प्रमुख महिला तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए एम राठोड ,संग्राम राळेभात, आर एस गढरी, के एन माळी, आर आर पाटील ,डी एम बहिरम, रवींद्र सपकाळे, श्री गांगुर्डे बीआर ढाकणे समन्वयक संदीप पाटील गणेश वायाळ ही देखील औरंगाबाद कडे रवाना झाले आहे यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी शहराध्यक्ष अक्षय मराठे, हर्षल चौधरी चेतन वाघ , योगेश गव्हाणे,कपिल पाटील शुभम पाटील बबडी शेख, राहुल पाटील, योगेश गव्हाणे, अमोल नानकर, मनोज पाटील, पप्पू राजपूत पद्मा पवार, आवडाआप्पा गवळी, संभाजी घु ले, मुकेश गोसावी ,सचिन पवार, सोनू अहिरे कल्पेश मालपुरे, भोजराज खैरे ,शिवराज पाटील ,सारंग जाधव,शिवराज पाटील समकित छाजेड, भाविक पटेल, भाऊसाहेब पाटील,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा