Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

२०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी ओम बोरसे,सोहम,भाविका, वेदिका,लावण्या यांची निवड





अमळनेर प्रतिनिधी शिवाजी पारधी : २४ व २५ ऑगस्ट२०१९ रोजी पुणे येथे आयोजित २०वी राज्यस्तरीय ज्युनिअर रोप स्किपिंग स्पर्धेत  ३० सेकंद व ३ मिनिट स्किपिंग प्रकारात जळगाव जिल्हा रोप स्किपिंग असोसिएशन, जळगांव संघ विजेता झाला. त्या संघातील विजेत्या खेळाडूंची २१ ते २३ सप्टेंबर २०१९ रोजी शिर्डी येथे आयोजित २०वी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

चि.ओम सुशिल बोरसे ( चावरा इंग्लिश स्कूल, धुळे), चि.सोहम बोरसे (ललिता पाटील इंग्लिश स्कूल, अमळनेर ), कु .भाविका बोरसे ( ललिता पाटील  इंग्लिश स्कूल अमळनेर  ), कु.वेदीका बोरसे ( सानेगुरुजी विद्या मंदिर अमळनेर ) 
 राष्ट्रीय स्पर्धत निवड झाल्याबद्दल जळगाव रोप स्किपिंग अध्यक्षा सौ.प्रेरणा सुशिल बोरसे, उपाध्यक्ष सुशिल बोरसे, गोविंद बोरसे यांनी अभिनंदन केले.

----------------------------------------------

प्रतिनिधी शिवाजी पारधी : अमळनेर येथिल १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिक स्व.सुपडू महिपत दोरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा जोशींपुरा येथे मा.आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न 
झाला.




अध्यक्षस्थानी अ. भा. वासुदेव जोशी गोंधळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश श्रीखंडे होते तर स्मारक उभारणारे नगराध्यक्षा सौ.पुष्पलता ताई पाटील मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.




"स्वराज्य ज्यांनी मिळविले त्यांना आज स्वातंत्र्य उपभोगणारे विसरले आहेत,"अशी खंत व्यक्त करून  मा.आ.गुलाबराव पाटिल यांनी अमळनेरच्या स्वातंत्र आंदोलनाच्या इतिहासास उजाळा दिला.

स्वातंत्र्य सैनिक सुपडू दोरकर यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींच्या प्रेरणेने इंग्रजांच्या विरोधात आंदोलन केले त्यामुळे धुळे येथिल जेलमध्ये त्यांना डांबण्यात आले तर नंतर पुणे येथील येरवडा जेलमध्ये बंदिस्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे येरवडा कारागृहात  सुपडू दोरकर यांनी २०० कैद्यांसह केलेल्या श्रमदानातून जलकुंभ बांधल्याची नोंद आजही असल्याचे सांगितले जाते.
 अहिराणी साहित्यिक  कवी कृष्णाजी पाटील, प्रा.अशोक पवार,बन्सीलाल भागवत यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन प्रास्ताविक रणजित शिंदे यांनी केले.

सदर स्मारकाची कल्पना मांडणारे वासुदेव गोंधळी जोशी समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर,उपाध्यक्ष नारायण शिंदे, महेश जोशी,प्रभाकर दोरकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
    
   (शैक्षणिक साहित्याचे वाटप)
               
स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या माध्यमातून स्व.शिक्षक वामनराव देवकर व स्व.शिक्षिका सौ.कुमुदिनी देवकर यांच्या स्मरणार्थ समाजातील गुणी, होतकरू,हुशार,गरजू विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, पॅड, कंपास, रजिस्टर बुक, वॉटर बॅग आदि भरगच्च शैक्षणिक साहित्य मा.आ.गुलाबराव पाटिल, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, रमेशदादा श्रीखंडे, प्रा.अशोक पवार आदींच्या हस्ते वाटप करण्याचा सामाजिक सेवाभावी उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध