Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
चोपडा महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चोपडाःप्रतिनिधी विनोद निकम :येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात विविध परीक्षांमध्ये व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॕ.सुरेश जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेच्या सचिव डाॕ. स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला . मान्यवरांच्या हस्ते एम काॕम परीक्षेत 75.69% गुण मिळवून सी ए परीक्षेतील आयपीसीसी गृप उत्तीर्ण झाल्याबद्दल स्नेहा सुरेश साखला, युवा संसद अंतर्गत पंचायत समिती चोपडा तर्फे आयोजित तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल भाग्येश राजेंद्र सोनवणे, संगमनेर येथे इन्स्पायर कॕम्पसाठी निवड झालेले प्रथमेश कोठावदे , मयूर पाटील व सचिन भारती व स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त प्रणिती महाजन व गृप आदिंचा गौरव करण्यात आला. अभ्यासाइतकेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असल्याचे मत संस्थेच्या सचिव डाॕ स्मिता संदीप पाटील यांनी मांडले.प्रास्तविक प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा सी आर देवरे यांनी केले. उपप्राचार्य प्रा बी एस हळपे यांनी आभार मानले . कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा व्ही वाय पाटील , प्रा एन बी शिरसाठ, प्रा पी आय जैन, प्रा किशोर राजपूत , श्री मनिष देसले आदिंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा