Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
लोहारा येथील सुपञाचा त्रीराज्यस्तरीय सामाजिक वधुवर परिचय मेळाव्यात पुन्हा समाजभुषण म्हणून गौरव होणार...
लोहारा येथील सुपञाचा त्रीराज्यस्तरीय सामाजिक वधुवर परिचय मेळाव्यात पुन्हा समाजभुषण म्हणून गौरव होणार...
लोहारा ता. पाचोरा प्रतिनिधी::- धुळे जिल्हा भोईसमाज महासंघ (रजि) द्वारा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश या ञीराज्यस्तरीय भोईसमाज सामाजिक वधुवर परिचय मेळावा,महीला मेळावा तसेच दिव्यांग,विधवा,विधुर,घटस्फोटीत आणि वयस्क यांचा परिचय मेळावा हा २० आॅक्टोबर रोजी केशवगार्डन मनोहर सिनेमाजवळ धुळे येथे संपन्न होत आहे या त्रीराज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्यात लोहारा येथील लोहारासुपुत्र श्री अर्जुन रामचंद्र भोई यांना पुन्हा जळगांव धुळे नंदुरबार नाशिक किंबहुना महाराष्ट्र,गुजरात,मध्यप्रदेश या परिसरातील भोईसमाज बंधुभगिनींच्या सहभागी कार्यक्रमात पुन्हा एकदा ""समाजभुषण"" या सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे आणि ही पुन्हा लोहारा वासियांना गौरवाची बाब ठरत आहे. आजपर्यंत श्री अर्जुन रामचंद्र भोई यांच्या सामाजिक जाणिवेतून समाजकार्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. श्री अर्जुन भोई हे राज्यातील संपुर्ण भटका समाज एकापटलावर यावा यासाठी कर्मवीर मा दादाईदाते साहेब यांच्या संघटन कार्यात कार्य करत आहेत. राज्यातील विमुक्त घुमंतूसमाज जनजातिच्या परिषदेवर ते राज्यउपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यातूनच ते भोईसमाज व त्याच्या तत्समजमाती ह्या एकापटलावर येऊन कार्यरत व्हाव्यात म्हणून राज्यात कार्यरत आहेत. श्री अर्जुनभोई यांना याअगोदर बाराबलुतेदार व अठराअलुतेदार याच्या पटलावरुन मुंबईत ""समाजभुषण"" समस्त मल्लावसमाज पुणे, यांच्याकडून महाराष्ट्राच्या पटलावर ""समाजगौरव"" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत झुंजत समाज उत्थानासाठी ते तन मन धनाने कार्यरत राहुन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्र तसेच दिल्लीच्या वाटेवर उमटवला आहे. समाजासाठी सामाजिक आर्थिक शारिरीक यासह त्यांनी आपले उल्लेखनिय योगदान दिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल पुन्हा धुळे जिल्हा भोईसमाज महासंघाने घेतली आहे. ही लोहारा वासियांना अभिमानाची बाब ठरत आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा