Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते शिंगावे येथे विकास कामाचे उद्घाटन

 



शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथे भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष तथा म्हाडाचे उपसभापती (राज्यमंत्री दर्जा) मा. बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरणचे उद्घाटन डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.*
 ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत शिंगावे येथे आदिवासीवस्ती मध्ये रस्ता काँक्रीटीकरण साठी 15 लक्ष रु निधी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याने  मंजूर करण्यात आला. यामुळे गावातील आदिवासी भागातील लोकांच्या रस्त्याच्या समस्या दूर होऊन आता रस्ते काँक्रीटीकरण होत असल्याने आदिवासी बांधवांनी मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी भाजपाचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच छोटू पाटील, माजी सरपंच मधुकर पाटील ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पाटील, सुनिल पाटील, शत्रुगन भील, आनंदा भील, लोटन पाटिल वाघेश्वरी ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश पाटील,गुलाबराव पाटिल ग्राम पंचायत सदस्य सम्भाजी पाटिल, माजी संचालक जयवंत पाटिल, एन डी पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटिल युवा मोर्चा उपाध्यक्ष मुन्ना पाटिल, रविंद्र पाटिल,यांसह सर्व ग्रामस्त उपस्थित होते.
-----------------------------------------------


शिरपूर प्रतिनिधी :शिंगावे येथील शिवमंदिर येथे विकास कामांसाठी 40 लक्ष रु निधी मंजूर
-----------------------------------------------




पर्यटन मंत्री मा. जयकुमार रावल यांच्याकडे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या सहकार्याने शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पर्यटन विकास विभागामार्फत शिंगावे शिवमंदिर येथे परिसर विकास व भक्तनिवास निवास साठी 40 लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 25 लक्ष रू निधी वितरीत करण्यात आला आहे.
या निधी मुळे शिंगावे येथील शिवमंदिर परिसराचा विकास होऊन भक्तांसाठी सर्व सोयीसुविधा युक्त भक्तनिवास देखील होणार असल्याने गावाच्या विकासात भर पडणार आहे.

एवढा भरभक्कम निधी मंजूर केल्याबद्दल मा मंत्री जयकुमार रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा म्हाडा उपसभापती मा बबनराव चौधरी,आणि शिरपूर तालुका प्रभारी डॉ जितेंद्र ठाकूर यांचे शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील,सरपंच जगदीश पाटील, शिसाका माजी संचालक जयवंत पाटील,मा सरपंच मधुकर पाटील, ट्रस्ट उपाध्यक्ष सुनील पाटील,मा उपसरपंच लोटन पाटील,परेश पाटील व ग्रामपंचायत शिंगावे शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध