Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

नाशिक येथील नामको हॉस्पिटल मध्ये क्लिनिकल रिसर्च सेंटरची सुरूवात.




पंकज पाटील ( उपसंपादक तरुण गर्जना )  
 नामको चारिटेबल ट्रस्ट संचलित नामको हॉस्पिटल  व नाशिक येथील ISO 9001:2015 मानांकित VSG Life Sciences LLP या रिसर्च कंपनीमध्ये या संदर्भात सांमजस्य करार करण्यात आला.
 
  • या उपक्रमाच्या माध्यमातून हॉस्पिटल परिसरात रिसर्च सेंटर चालू केले जाणार असुन संशोधनाच्या अंतर्गत असणार्या नवनविन उपचारात रुग्णांना सहभागी होता येणार आहे.
 
  • क्लिनिकल रिसर्च हा कोणत्याही उपलब्ध औषधांचा अविभाज्य भाग असून व त्याद्वारे संशोधनाच्या माध्यमातून नविन औषधौपचार शासन मान्यता प्राप्त करून  बाजारात उपलब्ध होऊ शकतात.
 
  • या संशोधना अंतर्गत रूग्णांना आजार व त्यासंबंधी संशोधनाअंतर्गत होणारे उपचार याबद्दल संपूर्ण माहिती लिखित  स्वरुपात पुरवली जाते.
 
  • रुग्ण व त्यांच्या नातेवाईक तसेच त्यांच्या  डॉक्टरांच्या परवानगी नंतर त्या रुग्णास संशोधनामध्ये सहभागी केले जाते.
 
  • संशोधन अभ्यासाचे फायदे व नुकसान तसेच रुग्णाचे हक्क व अधिकार  याची सखोल माहिती रुग्णाला पुरवली जाते व नंतर त्या रुग्णांना या अभ्यासात सहभागी केले जाते.
 
 अशी माहिती  VSG Life Sciences चे संचालक डॉ. वैभव गुलेचा यांनी दिली.
 
रिसर्चच्या अंतर्गत रूग्णांस सर्व उपचार व विविध तपासण्या मोफत पुरवल्या जातात व त्या रुग्णास संशोधना अंतर्गत होणार्या प्रत्येक लहानसहान गोष्टीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते.
 
रुग्ण या प्रक्रियेत स्वेच्छेने लिखित स्वरुपात त्यांचा सहभाग नोंदवत असतो-
 
 या नविन उपक्रमांमुळे नामको हॉस्पिटलमध्ये कॅन्सर व तत्सम आजारांवर नविन औषधांचा वापर तसेच येणार्या काळात बाजारात येऊ पाहत असणार्या औषधांचा फायदा रुग्णांना घेता येणार असल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी श्री. शशिकांतजी पारख यांनी दिली
 
 या करारा अंतर्गत *रिसर्च सेंटरची जबाबदारी  VSG Life Sciences कडे असणार असल्याची     माहिती सेक्रेटरी श्री.शशिकांतजी पारख यांनी दिली
 
 या करारावर  दि. १०/०९/२०१९ रोजी स्वाक्षर्या करण्यात आल्या
 

 हॉस्पिटलच्या वतीने सेक्रेटरी श्री. शशिकांतजी पारखVSG Life Sciences च्या वतीने संचालक डॉ. वैभव गुलेचा व सौ. सोनाली गुलेचा यांनी स्वाक्षर्या केल्या. नाशिक विभागातील नामको हॉस्पिटल मध्ये ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी व सैन्यदलात असलेल्या केंद्र शासन  सेवेतील लोकांसाठी देखिल विविध माध्यमातून सेवा पुरवली जात आहे. तसेच दवाखान्यात कॅन्सर व इतर आजारांवरील देखिल तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे.  जनतेला योग्य सुविधा देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे त्याच माध्यमातून त्यांनी रिसर्च सेंटरची सुरुवात केली आहे .त्यांच्या या सुविधांकडे जनतेचे  लक्ष लागून आहे .
 
याप्रसंगी हॉस्पिटल सेंटर प्रमुख डॉ. महेश पडवळ व व्यवस्थापन प्रमुख श्री. बाविस्कर उपस्थित होते. सदर करार करण्यासाठी नामको हॉस्पिटल अध्यक्ष श्री. सोहनलालजी भंडारी व ट्रस्ट मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध