Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

शिरपूर ओसवाल जैन समाजाला सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष. ओसवाल जैन समाजाच्या अध्यक्ष पदी सुवालाल ललवाणी




बभळाज (प्रतीनिधी) शिरपूर शहरातील ओसवाल जैन समाजाचे तत्कालीन संघपती ताराचंद डागा यांच्या निधनानंतर  समाजाचे अध्यक्ष पद सात ते आठ वर्षांपासून रिक्त होते.तरीही येथील समाज बांधवांनी विविध प्रकारच्या संप्रदायातील चार्तुमास आजपावेतो यशस्वी रित्या पार पाडले.शहरातील प्रसिद्ध व्यापारी धनराज बाफना यांची कन्या डॉ. प्राची बाफना व हंसराज बुरड यांची नात व मुकेश बुरड यांची जुळवा मुली स्नेहा व स्मिता बुरड यांच्यासह बाफना यांनी बालब्रम्हचारीतच संसाराला सोडून जैन धर्माच्या साध्वी पणाचे व्रत धारण केले.या तीन्ही मुली उच्चशिक्षित असून देखील त्यांनी अल्पवयातच संसाराचा मोह सोडून जिनशासनाच्या स्वाधीन झाल्या. शहरातील या तीन भगवती दिक्षा सोहळा सह बाहेरील दोन दिक्षार्थींचा सोहळा करण्याचा ही शिरपूर श्रीसंघाला मिळाल्याचा आनंद द्विगुणित आहे.सोहळ्यास बाहेरून हजारो भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहायाची त्यांच्या राहण्यापासून तर अनेक सुविधा येथील तरुणांनी करून दाखवली. समाज अध्यक्ष नसतांना ही समाजाने मोठ्या उत्साहात अनेक मोठमोठे कार्य व विविध संप्रदायाचे चातुर्मास पार पाडले पण समाजामध्ये कर्तबगार व्यक्ती किंवा अध्यक्ष नसल्याची खंत शहर व राज्यातील जैन समाजबांधवांना वाटत होती.अनेकदा समाजाच्या बैठका झाल्यात विविध विषयांवर समाजबांधवांच्या चर्चा व्हायच्या परंतु समाजाला मार्गदर्शन करणारा अध्यक्षच नव्हता.जणु काही या संघाची साडेसातीच सुरु होती.एकाच पदासाठी अनेक दावेदार असल्याने या पदासाठी विघ्न येत होते.अध्यक्षविना समाज जणु पोरका झाला होता.चातुर्मासा सह विविध सामाजिक कामासाठी संघपतीची आवश्यकता असते.संघपती विना अनेक उपक्रम समाजबांधवांनी यशस्वीरीत्या पार पाडली.परंतु संघपती नसल्याची उणीव व खंत होतीच.बाहेरील सामाजिक कार्यात या पदाची कमी जाणवत होती.सामाजीक ऊपक्रम एकजुटीने यशस्वीरीत्या करणारे शिरपूर समाज बांधवांचा संघपती का नाही या वरुन उलट सुलट चर्चा होत असल्याने नाराज होत होता.त्यामुळे समाजाला रोष सहन करावे लागत होते.अनेक संतांनी ही संघपती निवडण्याचे सांगितले होते. ऊशीरा का असेना तब्बल सात साडेसात वर्षांनी सुवर्ण दिवस उगवला २०२० या वर्षाच्या चातुर्मासाच्या नियोजनासाठी  बोलविण्यात आलेल्या सभेत संघपतीचा मुद्दा निघाला.सचिन बागरेचा या तरुणाने संघपती निवडीचा प्रश्न उपस्थित केला व सुवालाल ललवाणी यांचे नाव सुचविले  या वेळी सर्वांनी अनुमती देत एकमताने ओसवाल जैन समाजाच्या संघपती पदी सुवालाल ललवाणी याची प्रामुख्याने निवड केली.या  ठरावात मंजुर करण्यात आला.

या वेळी साधुमार्गी संप्रदायाचे अध्यक्ष विजय बाफना यांनी अध्यक्ष पद हे १५ महिन्या करिता ठेवावे व ज्या संप्रदायाचा चातुर्मास असेल त्यावेळी त्या चातुर्मासात त्या संप्रदायाचा अध्यक्ष राहील असा प्रस्ताव मांडला यास समाज बांधवांनी एकमताने मंजुर केला.

सुवालाल ललवाणी यांची संघपती पदी निवड झाल्याने आ.अमरीशभाई पटेल,भुपेशभाई पटेल,भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चोधरी, विविध जैन संप्रदायाचे संघपती,आजी माजी पदाधिकारी,समाज बांधव व  सोशलमिडीयाच्या माध्यमातून खांदेशभरातून समाजबांधवां कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध