Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

अमळनेरात ग्राहक पंचायतीतर्फे कायदेविषयक अभ्यास वर्ग संपन्न






अमळनेर दि.15प्रतिनिधी शिवाजी पारधी 
अमळनेर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे दिनांक 15  सप्टेंबर 2019 रोजी येथील रोटरी हॉलमध्ये ग्राहक संरक्षण कायदा त्यातील सुधारित कायदे याविषयी अभ्यास वर्ग संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश माननीय श्री संजयजी बोरवाल तसेच धुळे येथील जेष्ठ विधिज्ञ एडवोकेट जितेंद्रजी निळे व ॲडव्होकेट दीपक जोशी हे खास प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा  जळगांव जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विकास महाजन  हे होते. या अभ्यास वर्गाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष  मकसूदभाई बोहरी, सूत्रबद्ध शेरो शायरी सहित सूत्रसंचालन तालुका संघटक  राजेंद्र सुतार व आभार प्रदर्शन सचिव  विजय शुक्ल यांनी केले. या कार्यक्रमासाठी अमळनेरातील सर्व स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

याप्रसंगी धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाचे अध्यक्ष संजय बोरवाल यांनी  ग्राहक संरक्षण कायदा १९८६ तसेच सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले. 

समाजातील सर्वच घटक के ग्राहक असतात आणि प्रत्येकाला ग्राहक मंचाकडे न्याय मागण्याचा अधिकार असतो. ग्राहक मंचात अवघ्या 90 दिवसात न्याय मिळतो . त्याच प्रमाणे एडवोकेट जितेंद्र निळे यांनी अठरा वर्षाच्या खालील मुला मुलींना टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालविण्यास देऊ नका. कायद्याचे पालन करा व सुरक्षित रहा असा मौलिक सल्ला दिला एडवोकेट दीपक जोशी यांनी ही ग्राहक संरक्षण कायदे विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच अभ्यास वर्गाच्या अध्यक्षस्थानावरून विकास महाजन यांनीही  ग्राहक पंचायतीच्या कार्याची  माहिती देऊन अंमळनेर ग्राहक पंचायतीच्या कामांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी महिला आघाडी प्रमुख एडवोकेट भारती अग्रवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचा अल्प परिचय करून दिला. सदर चा अभ्यास वर्ग यशस्वी करण्यासाठी मकसूदभाई बोहरी, राजेंद्र सुतार, एडवोकेट भारती अग्रवाल, विजय शुक्ल, सुनील वाघ, महेश कोठावदे, ताहा बुकवाला, खदिर सादिक, मेहराज बोहरी, एडवोकेट उर्मीला अग्रवाल, अंजू ढवळे, ज्योती भावसार हेमंत भांडारकर अजय सिंग पाटील जयंतीलाल वानखेडे बापू चौधरी सतीश देशमुख आदींनी प्रयत्न केले.
ह्या कार्यक्रमासाठी अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा डॉक्टर अपर्णाताई मुठे सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक रंजनाताई देशमुख श्रीमती भारतीताई गाला,  करुणा सोनार, राजेश्री नेरकर, शर्मिला बडगुजर, उमाकांत नाईक, सेवा निवृत्त मुख्याध्यापक रामकृष्ण चव्हाण ,एडवोकेट प्रकाश बडगुजर, अविनाश कोतवाल, नरेंद्रभाई गुजराती, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी एलआयसी चे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश मुंडके,  व अमळनेरातील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट विजयकुमार ढिवरे यांचा ग्राहक पंचायत सभासद झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित नागरिकांच्या कायदे विषयी प्रश्नांना सर्वच मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिलीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध