शिरपूर (प्रतिनिधी) रासायनिक खतांचा, औषधांचा अति वापरामुळे दिवसेंदिवस शेती मधून उत्पन्न कमी होत असून आणि उत्पादन खर्च वाढत आहे.यासाठी शेतकऱ्यांनी जैविक कीडनाशक, बुरशीनाशकांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी शिरपूर तालुक्यातील लौकि गावाला भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी धनश्री सातपुते, सायली शेंडकर, अमृता
तोडकर,प्राजक्ता देशमुख, शितल बिडकर यांनी शेतकऱ्यांना निंबोळी अर्क कसे तयार करावे व त्याचा वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यात प्रत्यक्ष प्रात्यक्षित करून माहिती दिली .त्यात त्यांनी ५ किग्रा निंबोळी चुरा,९ लिटर पाण्यात रात्रभर भिजत टाकावे ,तसेच १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा भिजत ठेवला .दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क फडक्यातून गाळून घेतला आणि फळबागेत फवारणी केली.निंबोळी अर्क वापरल्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो .तसेच पर्यावर्णाची हानी होत नाही.पीक उत्पादनात वाढ होते. असे शेतकऱ्यांना दाखवून दिले. या कृषीकन्यांना धुळे येथील कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवकर ,विषय प्रमुख डॉ.महाले,कार्यक्रम अधिकारी डॉ.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा