Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

संभाजी विनायकराव भिडे रा. सांगली (श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेचे संस्‍थापक) याचा निषेध





संभाजी विनायकराव भिडे रा. सांगली (श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेचे संस्‍थापक) याचा निषेध करणे बाबत व त्याचे विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणे बाबत.आज तहसिलदार कार्यालयात प्रांत अधिकारी फैजपुर ,व तहसिलदार यांना समस्त बौद्ध समाज रावेर ता.रावेर याचे वतीने निवेदन देण्यात आले.

प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.की, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत भाषण करतांना वक्तव्य केले होते. की, "भारताला युध्द नको.....भारताने जगाला बुध्द  दिला" पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर संभाजी भिडे याने काल दि. २९ मे २०१९ रोजी सांगली येथे जाहिर सभेत बोलतांना म्हणाला की, "पंतप्रधान अमेरिकेत म्हणाले की, भारताने जगाला बुध्द दिला....पण बुध्द उपयोगाचा नाही.अजिबात उपयोगाचा नाही. "संभाजी भिडेच्या या वक्तव्याची बातमी आम्ही अनेक टि.व्ही चॅनलवर  पाहील्याने व आज रोजिच्या वर्तमान पत्रान्मध्ये वाचल्याने आम्ही बौध्द धम्मीय असल्याने आमच्या धार्मीक भावना दुखावलेल्या आहे. भिडे याचे वरील वक्तव्ये जातीय तनाव निर्माण करणारे आहे म्ह्णुन आम्ही भिडेचा जाहिर निषेध करतो तसेच भिडे याचे विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची व त्याला महाराष्ट्र राज्यातुन हद्दपार करण्याची मागणीचे निवेदन समस्त बौद्ध समाज रावेर ता.रावेर जि.जळगांव यांचे वतीने देण्यात आले.तसेच प्रत मा.राष्ट्रपती सो,भारत, मा.प्रधानमत्री सो, भारत सरकार, मा.राज्यपाल सो, महाराष्ट्र,व मा.उपविभागीय अधीकारी सो.फैजपुर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर दिलीप कांबळे, राजु सवर्णे, ॲड.योगेश गजरे, राजेंद्र अटकाळे, सावन मेढे, महेश तायडे, दिपक राजधर तायडे, मनोहर कोळी,संजय हेरोळे, संतोष ढिवरे, ईश्वर जाधव, दिपक सुरेश तायडे सर, प्रदिप सपकाळे, पंकज वाघ, चंद्रकांत गाढे, किसन गाढे, अॅड. सुभाष धुंदले, विजय अवसरमल, संघरत्न दामोदरे, जगदिश घेटे, धनराज घेटे, प्रकाश तायडे, बाळु शिरतुरे, राजेंद्र पानपाटिल. इत्यादीच्या निवेदनावर सह्या आहे.


(2)-------------------------------------------
अजीज शेख रावेर: रावेर विधानसभा मतदार संघातून आज आजी-माजी मंत्री पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आमदार हरिभाऊ जावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
----------------------------------------------



शहरातील मानाचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरावर माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह उमेदवार आ. जावळे यांनी गणपतीचे विधीवत पुजन व आरती केले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात येवून तहसील कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणूकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. प्रचंड घोषणाबाजी व शक्तीप्रदर्शन करत मिरवणूक तहसील कार्यालयात आल्यावर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी माजी जि.प. शिक्षण सभापती सुरेश धनके, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, रिपाइ जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन उपस्थित होते. आ.जावळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजप जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नेते सुरेश धनके, हिरालाल चौधरी, मसका चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, व्हाइस चेअरमन भागवत पाटील, हरीश गणवानी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, जळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर भाजप तालुका अध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्ष योगिराज पाटील, युवासेना शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, सुरेखा कोळी, शिव सेना जिल्हा उपप्रमुख तुशार उर्फ मुन्ना पाटील, तालुका अध्यक्ष रवी सोनवणे, रिपाइ जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुका अध्यक्ष गणेश पवार, तालुका अध्यक्ष अरुण गजरे, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार, रावेर पस सभापती माधुरी नेमाडे, यावल पं.स. सभापती पल्लवी चौधरी, जि.प.सदस्य नंदा पाटील, रंजना पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील, पी.के.महाजन भाजप, संदीप सावळे शिवसेना, महायुतीचे सर्व जि.प. पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आघाडी अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, लोप्रतिनिधी, पेज प्रमुख, शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, कार्यकर्ते, महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध