Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

जागतिक स्वेच्छा रक्तदान दिनानिमित रेडक्रॉस रक्तपेढी आयोजित सायकल रॅली विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपन्न





जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई 
जळगाव- इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव संचलित राक्त्पेधीच्या वतीने आज जागतिक स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची सायकल रॅली संपन्न झाली.  या रॅली मध्ये सेंट टेरेसा स्कूल आणि उज्वल स्पौटर इंटरनॅशनल स्कूलमधील 125 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

“रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान जीवनदान,” “जात धर्म पंथ कुठला ही भेद मानत नाही रक्तदान,रक्तदान  करून वाढवूया आपल्या देह मंदिराची शान,” “आटत नसतो कधीच रक्ताचा झरा..दर तीन महिन्यांनी रक्तदान करा..” “नॅट सुरक्षित रक्ताची मागणी करूया.आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे जीवन अधिक सुरक्षित बनवूया..,” “नॅट प्रमाणित रक्त,” “सर्वात सुरक्षित रक्त, रक्तदान करके देखिये..अच्छा लगता है....” “कुणालातरी आयुष्य भेट म्हणून देऊ या...चला रक्तदान करूया..” अशा प्रकारचे रक्तदानाचे स्लोगन लिहिलेले पोस्टर मुलांच्या सायकलवर लावण्यात आले.  
“बना ये स्वच्छ सुरक्षित देश, इसलीये प्लास्टीक का करे निषेध”, पर्यावरण को अगर बचाना है..तो प्लास्टीक को उपयोग मे नाही लाना है.”, “ सबको आगे आना है, धरती को बचाना है..” प्लास्टीक मुक्त जीवन, निरोगी आयुष्याला आमंत्रण”  “कहो प्लास्टीक को ना...पर्यावरण को हा...” अशा प्रकारचे प्लास्टीक मुक्तिचे स्लोगन लिहिलेले पोस्टर मुलांच्या सायकलवर लावण्यात आले. 
 
सकाळी काव्यरत्नावली चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष श्री.गनी मेमन,मानद सचिव श्री.विनोद बियाणी, कोशाध्यक्ष श्री. सतीश चरखा, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी,  कार्यकारणी सदस्य श्री. जी.टी.महाजन, डॉ.अपर्णा मकासरे, प्रशासकीय अधिकारी श्री. लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, शिक्षक श्री. शैलेश जाधव आणि पवन सोनार हे उपस्थित होते.

ही रॅली काव्यरत्नावली चौक- आकाशवाणी चौक- स्वातंत्र्य चौक- पांडे चौक- रेडक्रॉस भवन- चित्रा चौक- नेहरू चौक- खानदेश सेंट्रल अशा पद्धतीने मार्गस्थ झाली. रक्तदान प्रचार प्रसार जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत व्हावा असा त्यामागचा उद्देश आहे.

या रॅलीच्या समारोप प्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगितले की तुम्ही सर्व भावी रक्तदाते आहात.आपल्या रक्तदानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळते. आपण रक्तदान करण्यासाठी इतरांना प्रेरित करा. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री.गनी मेमन यांनी ही  सिंगल युजप्लास्टिक वापर बंद करण्याबाबत आवाहन करून रक्तदान दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या. रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्व संगितले. आरोग्य अधिकारी श्री. उदय पाटील, श्री. महेद्र पाटील व रेडक्रॉसचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले व श्री. विनोद बियाणी यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी  सेंट टेरेसा स्कूलचे शिक्षक श्री. शैलेश जाधव आणि उज्वल स्पौटर इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक पवन सोनारयांचा आयुक्त  डॉ. उदय टेकाळेयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात रेडक्रॉसच्या सर्व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.


     
(२)-------------------------------------------
रेडक्रॉसच्या स्वयंसेवकांनी केले बी.जे. मार्केट मधील प्लास्टीक संकलन व परिसरातील दुकानदारांना प्लास्टीक बंदचे आवाहन
----------------------------------------------



जळगाव प्रतिनिधी -योगेश भोई 
जळगाव- 2 ओक्टोंबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करत असताना  सिंगल युज प्लास्टीक मुक्ती अभियान संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.पर्यावरण वाचविण्याच्या उद्देशाने हे अतिशय कौतुकास्पद पाऊल समजले जात आहे. 
 
याचाच एक भाग म्हणू आज रेडक्रॉस परिसरातील बी.जे. मार्केट मध्ये जाऊन सर्व प्लास्टीक गोळा करण्याचे काम रेडक्रॉसच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी केले. सकाळी 9 वाजता रेडक्रॉसच्या सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक, व कर्मचारीसह महानगरपालिका आयुक्त श्री. उदय टेकाळे यांच्या उपस्थितीत प्लास्टीक गोळा करायला सुरुवात केली. माननीय आयुक्त यांनी स्वत: प्लास्टीक गोळा करत परिसरातील नागरिकांना सिंगल युज प्लास्टीक बंदचे आवाहन केले मा.आयुक्त यांनी बी.जे. मार्केट मध्ये जाऊन परीक्षण करत नागरिकांना कडक शब्दात समजही दिली

तीन तासात 10 गोण्या सिंगल युज प्लास्टीक गोळा झाले.* हे जमा प्लास्टीक महानगरपालिकेला पुढील प्रक्रियेसाठी देण्यात आले.

या सर्व सिंगल युज प्लास्टीक मुक्ती अभियानासाठी लागणारे 1000 हातमोजे आणि 1000 मास्क रेडक्रॉसच्या वतीने देण्यात आले.
 
या प्रसंगी  महानगरपालिका आयुक्त श्री. उदय टेकाळे, उपाध्यक्ष श्री.गनी मेमन,मानद सचिव श्री.विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारणी सदस्य श्री. जी.टी.महाजन, प्रशासकीय अधिकारी श्री. लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा आणि रेडक्रॉसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध