Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.







शिंदखेडा प्रतिनिधी :यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुभाष भामरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, भाजपाचे बबन चौधरी, अनुप अग्रवाल, धुळयाचे महापौर चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष नथा पाटील, दोंडाईचा शहराच्या नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल, शिंदखेडा शहराच्या नगराध्यक्षा सौ.रजनी वानखेडे, सरकारसाहेब रावल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुभाषदादा देवरे, दादासाहेब रावल दुध संघाचे चेअरमन विक्रांतसिंह रावल, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन छत्रसिंह गिरासे, जिल्हा परीषद सदस्य कामराज निकम, यांच्यासह 120 गावांचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, दोंडाईचा आणि शिंदखेडा पालिकेचे नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

ना.जयकुमार रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी सकाळी 11 वाजेपासुन बिजासणी मंगल कार्यालयात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भाजपा, शिवसेना, आर.पी.आय. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सभेला संबोधित केले

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बिजासणी मंगल कार्यालयापासुन भव्य अशी जोरदार रॅली काढण्यात आली,शिंदखेडा शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्यांदा एवढी प्रचंड गर्दी जमली होती. 
 
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिंदखेडा शहरातील कॉग्रेसचे प्रमुख नेते, माजी पंस सभापती  प्रा.सुरेशभाऊसाहेब देसले यांनी भाजपात प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध