Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

शिरपूर डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल



              शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींनी वेग घेतला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाच्या एबी फॉर्म अजून कोणालाही जाहीर केलेला नाही. त्यामुळे नेमका भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कोण याबाबत संभ्रम असताना व काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या आमदार पावरा व भाजपचे निष्ठावंत डॉक्टर जितेंद्र ठाकूर या दोघांनाही भाजपाच्या ए बी फॉर्म मिळण्याची अपेक्षा आहे . मात्र अंतिम निर्णय  याबाबत झालेला नाही. तरी आधिक चे शक्तिप्रदर्शन न करता शेकडोंच्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  या वेळी कार्यर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली  आणि भाजप आपल्या मागणीनुसार मला न्याय देईल असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला आहे. मात्र तरीदेखील डॉक्टर ठाकूर यांनी एक अर्ज पक्षाच्या, एक अर्ज अपक्षाचा आणि एक अर्ज आपल्या पत्नी सौ शितल ठाकूर देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास डॉ जितेंद्र ठाकूर व डॉ शितल ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज शिरपूर येथील डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या दादुसिंग काँलनी येथील राहत्या घर येथून पायी चालत तहसील कार्यलय पर्यंत येत तेथे डॉ जितेंद्र युवराज ठाकूर व डॉ शितल जितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.यात डॉ जितेंद्र युवराज ठाकूर यांनी दोन अर्ज दाखल केले तर डाँँ शितल जितेंद्र ठाकूर यांनी एक अर्ज दाखल केला.सर्वसाधारण पणे पायी चालत घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या अर्ज दाखल करतेवेळी सोबत नगरसेवक राजेंद्र राजपुत, नगरसेवक चंदन राजपूत,भुषण मोरे,कन्हैलाल पावरा आदी जण उपस्थित होते तर डाँ शितल जितेंद्र ठाकूर यांचा अर्ज दाखल करतांना सोबत नगरसेवक सुलोचनाताई पाटील,भाजपा उपाध्यक्ष मिलींद पाटील,हिरालाल कोळी,धिरज राजपूत,डिगंबर पाटील आदी जण उपस्थित होते.यावेळी मिरवणूकीत सोबत डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या समर्थनास मोठी गर्दी उपस्थित होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध