Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

चोपडा येथे शिवसेनेच्या कर्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद यक्त केला




जळगाव प्रतिनिधी योगेश भोई 
चोपडाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने चोपाड्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

चोपडा येथील आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उच्च न्यायालयाने जळगाव घरकुल घोटाळा प्रकऱणातुन आज  जामीन मंजूर केल्याने चोपाड्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. दि.
४ रोजी आज संध्याकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोपडा येथे  शिवसेनेचे कार्यकर्ते  आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा सोबत बंधू नरेश बळीराम सोनवणे, प्रा. ए. के. गंभीर, ऍड एस. डी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, शिवसेनेचे 

उपजिल्हासंघटक दिपकसिंग जोहरी , शहर प्रमुख आबा देशमुख , गटनेता भैया पवार, तालुका संघटक सुकलाल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी, विधानसभा क्षेत्र संघटक नामदेव पाटील, नरेश महाजन, प्रकाश राजपूत, नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, देवीदास सोनवणे, सुनील पाटील, राजेंद्र जयस्वाल, सुनील बरडीया, सोपान पाटील, चंदू महाजन, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध