Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
चोपडा नगरपरिषदेकडून प्लास्टिक कचरा संकलन व कापडी पिशव्या वाटप
चोपडा(प्रतिनिधी)विनोद निकम
चोपडा नगर परिषदेच्या वतीने २ ऑक्टो महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शासनाचा निर्देशानुसार शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने शहरातील बचत गटांना सिंगलयुझ कॅरी बॅग न वापरण्याबाबत शपथ देण्यात आली.गोलमंदिर,तहसील चौक,मेनरोड वरील प्लॅस्टिक कचरा संकलन करण्यात आला.प्लास्टिक पिशव्या यांचा वापर बंद करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी महिला बचत गटांनी तयार करण्यात आलेल्या कापडी पिशव्याही वाटप करण्यात आल्यात.
सदर कार्यक्रमास नगराध्यक्षा मनीषा चौधरी,गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक डॉ रवींद्र पाटील,नगरसेविका दीपाली चौधरी,शोभा देशमुख मुख्यधिकारी अविनाश गांगोडे व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. गणेश पाठक, अरुण राजपूत,सलीम तडवी,पूनम पाटील,मोनिका गुजराथी यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा