Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार शिरीष चौधरींनी दाखल केली उमेदवारी.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार शिरीष चौधरींनी दाखल केली उमेदवारी.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार शिरीष चौधरींनी दाखल केली उमेदवारी, एकात्मतेचे दर्शन घेऊन प्रतिपंढरपूरात झाले भाजपमय
अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाइं,रासपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.शिरीष चौधरी यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सह हजाराचा जनसमुदाय वाडी संस्थान येथून आशिर्वाद घेऊन पानखिडकी,सराफ बाजार,दगडी दरवाजा पांचकंदील चौक,सुभाष चौक,बालेमिया धुळे रोड मार्ग महाराणा प्रताप चौक अशी ही प्रचार यात्रा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयात पोहचली. याप्रसंगी " संत सखाराम महाराज की जय", "कोण म्हणतं येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही..""शिरीषदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" या जोरदार घोषणा बाजी व शक्तीप्रदर्शन करत ढोल-ताशांच्या गजरात प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
या रँलीत हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी, विधान परिषद आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार बी.एस .पाटील, माजी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, , अँड.ललिता पाटील , रेखाताई चौधरी , प्रा. ज्योती धनराज भोई राष्ट्रीय समाज पक्ष युवती जिल्हा अध्यक्षा
अनिता चौधरी ,आरपीआयचे श्याम संदानशिव व यशवंत बैसाने,न.पा तील विरोधी गट नेते बबली पाठक,अबू महाजन,बाळासाहेब संदानशिव , नगरसेविका सविता संदानशिव, नगरसेवक सलीम टोपी, श्याम पाटील, श्रीराम चौधरी , सुनील भामरे ,रासप बाळू पाटील, विक्रांत पाटील,IPS साहेबराव पाटील , ,आरीफ भाया, फिरोज मिस्तरी, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश सांळुखे, यासह अनेक नगरसेवक, जि प सदस्य, प स सदस्य , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी एके काळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधकांची उपस्थिताने अनेकांचे डोळे विस्पारले होते. ज्यांचे येणे अनअपेक्षित होते ते आले आणि सारे अनपेक्षितपणे घडले अनेकांना आश्चर्य वाटले.
केवळ पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेशामुळेच आल्याचे चर्चा शहरात सर्वत्र सुरु होती,पुढील काळात कोण ? किती ? कोणाला ? मदत करेल , हे बघणे उत्सुक तेचे ठरेल.
तसेच बबली पाठक,अबू महाजन.,बाळासाहेब संदानशिव , नगरसेविका सविता संदानशिव, नगरसेवक सलीम टोपी, श्याम पाटील,श्रीराम चौधरी ,सुनील भामरे,मनोज शिंगाने, सर्व शिरीष दादा मित्र परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण भागातील तरूण व तरूणी देखील सहभागी झाल्या. हजारो च्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा