राजकारणात सामाजिक कार्य असते याचा विसर राजकर्त्यांना पडला आहे .
आमदार बच्चू कडू यांचे प्रत्येक काम समाज हिताला धरूनच .
५ ऑक्टोबर २०१९
चार दिवसांपुर्वी अमरावतीच्या परतवाडा शहरात क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आली होती .त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता .यातच दोन गटाच्या हाणामारीत आणखी दोन लोकांचा बळी गेला होता.त्यामुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी विद्यमान आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता अमादार बच्चू कडू यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले होते .
"आमदार बच्चू कडू यांनी शांततेचे आवाहन करत उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला".
लोकनायक आमदार बच्चू कडू हे चौथ्यांदा विधानसभेसाठी उभे राहिले असून शेतकऱ्यांचा बुलंद आवाज रोखण्याचा प्रयत्न सर्व पक्षांकडून ताकदीनिशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकनायक बच्चू कडू यांचे कार्य गरीब –दिन दुबळे ,रुग्णसेवा ,अपंग ,शेतकरी कष्टकरी यांना समर्पित असून तालुक्याचा सर्वांगीण विकासाचे ध्येय त्यांच्या कडे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा