Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जानेवारी, २०२०
बभळाज गावजवळ भीषण अपघात 13 जखमी
बभळाज:प्रतिनिधी: प्रवासी घेऊन जाणारी कु्रझर नाल्याच्या पुलावरुन खाली कोसळली़ यात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति अत्यावस्थ आहे़ ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ गाडी ही वेगात असल्याने वळण रस्त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे़
एमएच १५ सीएम ३९९० क्रमांकाची कु्रझर चालक आत्माराम विष्णू बोरसे (रा़ लोणी, फत्तेपूर) याने जामनेर येथील प्रवाश्यांना घेऊन मध्यप्रदेशातील पानसेमल येथे जात होते़ बभळाज गावाच्या पुर्वेस आनंदा महाजन यांच्या शेताजवळील नाल्याच्या पुलाच्या जवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली क्रुझर थेट नाल्यात जावून कोसळली़ या गाडीत ११ प्रवासी बसलेले होते़ ते सर्व जखमी झाले असून यातील एकाची प्रकृति चिंताजनक आहे़ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे बभळाज ग्रामस्थ गावातच होते़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ मदत कार्य वेगाने सुरु झाल्याने जखमी झालेल्या प्रवाश्यांना शिरपूर येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तातडीने दाखल करण्याचे काम करण्यात आले़ या अपघातात शिवाजी राजाराम खैरे, विशाखा श्रीकृष्ण सोनवणे, श्रावण सुकदेव ताठे, अमोल भारत बोरसे, रेणुका उत्तम बोरसे, गजानन रघुनाथ जाधव यांच्यासह अन्य प्रवाशांचा समावेश आहे़ दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती़ मदतकार्य वेगाने सुरु आहे़
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा