Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जानेवारी, २०२०
बलवाडी येथे हरिनाम सत्संग सोहळ्याचे तीन दिवस आयोजन
रावेर:प्रतिनिधी:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच बलवाडी सिंगत शिवारात तीर्थक्षेत्र श्रृंगधाम पावन भूमित तीन दिवस हरिनाम संकीर्तन सत्संग सोहळा चे आयोजन करण्यात आले
असून यात दिनांक ९ जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी सहा ते आठ गणपती स्रोत पाद्य पूजन व कलश स्थापना श्री ह भ प बाळू महाराज खिर्डी यांच्या हस्ते ,संध्याकाळी ईश्वर महाराज व भजनी मंडळ भजनी कार्यक्रम . दिनांक १० शुक्रवार रोजी सकाळी आठ ते दहा गणपती मंदिरावर पाद्यपूजन कार्यक्रम व पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम रात्री आठ ते दहा ह भ प बाल कीर्तनकार मोहित
महाराज उटखेडा यांचे बलवाडी भागवत महाराज यांच्या घराजवळ जाहीर कीर्तन. दिनांक ११ रोजी शनिवारी सकाळी सात ते दहा बलवाडी ते श्रृंग आश्रम पालखी सोहळा मिरवणूक ह भ प ईश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघेल तर दहा ते अकरा वाजेला मान्यवरांचे स्वागत नंतर अकरा ते एक वाजेला काल्याचे किर्तन श्री देव गोपाल जी शास्त्री आडगावकर यांचे राहील. या सोहळ्यास प .पु. सु. ग .कोठारी स्वामी केशव चरणदास वीरसद ,प. पु. गोपाल चैतन्य महाराज वृंदावन धाम पाल ,परमपूज्य परमानंद गिरिजी महाराज जिन्सी ,देव गोपाल शास्री महाराज ,गुरुवर्य भागवताचार्य ह.भ.प शामजी महाराज (उटखेड़ा ),ह भ प ईश्वर महाराज (बलवाड़ी),ह भ प नारायणजी महाराज (भामलवाडी),कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटिल, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल, रावेर आमदार शिरीषदादा चौधरी ,रा. कॉ. जिल्हा अध्यक्ष अॅड रविंद्र भैया पाटील, जनसंग्राम चे संस्थापक विवेक ठाकरे, बलवाडी, सिंगत गावातील व परिसर सह तालुक्यातील भाविक उपस्थित राहणार आहे तरी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रृंगऋषि सेवा आश्रम व बहुउद्देश्यीय संचालक मंडळ ,बलवाड़ी सिंगत शिवार चे भागवत महाजन व पदधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा