Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २१ जानेवारी, २०२०
निंभोरा सह परिसरात 2822 बालकांना दिले पल्स पोलिओचे डोस
रावेर:प्रतिनिधी:येथील निंभोरा आरोग्य केंद्र अंतर्गत निंभोरा सह १४ गावांमधील ३२२२पैकी २८२२ शून्य ते पाच वयोगटातील लहान बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आले निंभोरा सह १४ गावांमध्ये निंभोरा आरोग्य केंद्र अधिकारी चंदन पाटिल,मोनिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
पल्स पोलिओ डोस मोहिम यशस्वी होण्यासाठी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक आर .एस. जाधव,आरोग्य सहाय्यिकाबावस्कर ,चौधरी,आरोग्य सेवक के. एस.महाजन,सर्व आरोग्य सेवक ,मदतनीस धनाबाई महाजन,यासह सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशावर्कर यांनी कामकाज पाहिले.
एकूण १४ गावा मध्ये २५बूथ होते तर निंभोरा बु येथे एकूण ७ बूथ होते यात निंभोरा आरोग्य केंद्र ,बंगला शाळा, कोळी वाडा अंगनवाडि, कन्या शाळा, डॉ विजय पाटिल दवाखाना, निंभोरा स्टेशन शाळा ,रेल्वे स्टेशन या बूथ वर अंगणवाडी सेविका सिंधुबाई कोळी,माधुरी पाटिल, मंगला ठाकरे तसेच आशावर्कर सुनीता बोरसे, मनीषा पवार, ज्योति बोरोले, कुंदा बऱ्हाटे,तृणाली खाचने, योगिता बऱ्हाटे,जयश्री पाटिल, प्रतिभा ठाकरे ,माया मोरे, मीरा धर्मे व आरोग्य सेविका ,सेवक यांनी कामकाज पाहून परिश्रम घेतले .निंभोरा येथे ९८टक्के पल्स पोलिओ चे डोस देण्यात आले .निंभोरा स्टेशन जि प शाळेत सपोनि महेश जानकर ,फौजदार योगेश शिंदे यांच्या हस्ते पल्स पोलिओ डोस पाजून सुरवात करण्यात आली यावेळी राजीव बोरसे ,रविन्द्र तायडे ,सतीष तायडे, नवाब पटेल, सौ प्रतिभा तायडे, आशावर्कर सौ सुनीता बोरसे, माया मोरे उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा