Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

निंभोरा येथील विद्यार्थ्यांचा २५वर्षांनंतर स्नेहमेळावा संपन्न, सोशल मीडिया व मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा व्यक्त केला मानस.



रावेर:प्रतिनिधी:निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कुल च्या १९९४ च्या बॅच च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तब्बल २५ वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहमेळावा साजरा करीत शाळेतील आपापल्या आठवणी व गुरुजनांचे अनुभव कथन केले.
यावेळी आपापल्या मुलांना सोशल मीडिया व मोबाईरलचा वापर यापासून दूर ठेवून त्यांना खेळासह इतर गोष्टीत गुंतवण्याचे आवाहन करीत मुलांना वेळ देण्याबाबतचा मानस व्यक्त केला.

यावेळी या स्नेहमेळाव्यास निंभोऱ्यासह भुसावळ,जळगाव,पाचोरा,धुळे,मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर यांसह वेगवेगळ्या शहरांतून व गावांतून सर्व जण उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपापले अनुभव कथन करीत आपापल्या यशाची रहस्ये व त्या काळातील आपापला अनुभव कथन केला.  

पुढील स्नेहमेळावा निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कुल मधेच घेण्याबाबत व आपल्या शाळेसाठी काहीतरी करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी २५ वर्षानंतर भेटण्याचा आनंद सर्वांनी व्यक्त करून पुन्हा कुटुंबासह भेटण्याचा निर्धार व्यक्त करीत आपापल्या कार्यक्षेत्राकडे मार्गक्रमण केले.

यांचा होता स्नेहमेळाव्यात सहभाग-
दीपक सोनार,विजय पाटील,दिनेश सोनार,प्रशांत ठाकरे,सुनील कोंडे,दीपक पाटील,विवेक नेहेते,रवींद्र भोगे,वंदना पाटील, मानसी फालक,जयश्री पाटील,सुवर्णा नेहेते,वैशाली गुरव,मोहिनी बोंडे,रेखा ब-हाटे,गोकुळ भोई,नितीन ढाके,दीपक चौधरी,डॉ. विजय नाईक,रवींद्र उंबरकर,चारूलता नेहेते,मीनाक्षी चौधरी,नीलिमा सरोदे,विकास पाटील,निशा बारबंद,संगीता जावळे,संदीप मोरे,भरत सोनवणे,सुवर्णा पाटील,मिलिंद राणे,डॉ.शैलेंद्र ब-हाटे,महेंद्र नेमाडे,अथर्व फालक.

यावेळी अथर्व दिनेश फालक याने आईवर तर गोकुळ भोई यांनी मैत्रीवर कविता सादर केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश फालक,रवींद्र भोगे,मानसी फालक यांसह आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील कोंडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध