Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
खिरवड विद्यालयात रंग तरंग स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
रावेर:प्रतिनिधी:शाळांच्या विकासासाठी महा विकास आघाडी सरकारने केला प्रकल्प तयार आ. शिरीष चौधरी
विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर कौशल्य सुध्दा उपयोगी ठरतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य विकसित करून आम्ही कुठे कमी पडत नाही हे दाखविले पाहिजे.
मराठी माध्यमांच्या शाळा सुध्दा आता अभ्यासोत्तर कार्यक्रम राबवून इतर माध्यमांची बरोबरी करत आहेत .
शाळांच्या विकासासाठी महा विकास आघाडीच्या सरकारने एक प्रकल्प तयार केला असून शाळांचा विकास घडवून आणला जाणार आहे असे प्रतिपादन खिरवड ता. रावेर येथील विकास माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले .
यावेळी प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्ष सौ . रंजना पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दुर राहावे व पालकांनीही मोबाईल आपल्या पाल्याला देवू नये . असे आवाहान त्यांनी केले .
या स्नेहसंमेलनात मराठी गिता बरोबर भारूड , बेटी बचाव बेटी पढाव , बालविवाह , मुक अभिनय सारख्या नाटिका सादर केल्या या कार्यक्रमात जवळ जवळ पन्नास मुलामुलींनी सहभाग घेतला
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे. के. पाटील यांनी केले .
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे आ. शिरीष चौधरी जिप अध्यक्ष सौ . रंजना पाटील, मुख्याध्यापक तुकाराम बोरोले एन.व्ही. पाटील पी .एल. नरवाडे, भैया साहेब पवार डॉ शांताराम पाटील , ललीत चौधरी शाळेचे चेअरमन कडू पाटील जिजाबराव चौधरी ,जितेंद्र पाटील भिमराव पाटील ,शालीकग्राम लासुरकर कमलाकर पाटील , डॉ . राजेंद्र पवार उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर पाटील व आभार नगिन इंगळे यांनी मानले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा