Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
तिर्थक्षेत्र श्रृंगधाम बलवाडी येथे तिन दिवसीय सतसंग सोहळा संपंन्न. मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची ही होती उपस्थीती. सजीव देखाव्याने भाविकांचे मन मोहले. ८ ते १० हजार भाविकांनि लावली हजेरी.
तिर्थक्षेत्र श्रृंगधाम बलवाडी येथे तिन दिवसीय सतसंग सोहळा संपंन्न. मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची ही होती उपस्थीती. सजीव देखाव्याने भाविकांचे मन मोहले. ८ ते १० हजार भाविकांनि लावली हजेरी.
रावेर:प्रतिनिधी:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच बलवाडी येथिल श्रृंगधाम आश्रमात श्रृंगऋषी सेवा आश्रम व बहुउद्देशीय संचालक मंडळ यांच्या तर्फे तीन दिवसीय भव्य सतसंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सांगता तीसऱ्या दिवशी सकाळी ७ ते १० बलवाडी गावातून भव्य पालखी सोहळा डिंडी काढण्यात आली या सोहळ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीतख, भरत, शत्रुघ्न, हनुमान, लव, कुश, वाल्मीक ऋषी, श्रृंगऋषी यांच्या सर्व भाविकांचे मन मोहणाऱ्या सजीव देखाव्याने दिंडीला विषेश रंगत आली होती. यादेखाव्यात श्रीरामच्या भुमीकेत प्रथमेश महाजन, सिता- मिनाक्षी अजलसोंडे, लक्ष्मण-दिपाली अजलसोंडे, भरत- राणी महाजन, शत्रुघ्न- प्रतिक्षा सावकारे, हनुमान- मानव महाजन, लव-अपेक्षा महाजन, कुश-सानिका महाजन, वाल्मिकी ऋषी-राहुल पाटील, श्रृंगऋषी-जयेश महाजन हे होते. सिंगत, बलवाडी, निंभोरा, विवरा, मस्कावद, भामलवाडी, खिर्डी, गोलवाडा, दसनूर सह परिसरातील महिला व पुरूष भजनी मंडळींनी सुंदर सुंदर भजणांनी शोभा वाढवली.
पालखीचे नेतृत्व बलवाडी येथिल ईश्वर महाराज, प्रा.गोपाल महाजन, निंभोरा येथिल सुभाष महाराज, महिला दक्षता समिती सदस्या आशा धनगर, नंदनी पंत व सहकारींनी केले. पालखी सोहळ्या नंतर आश्रमात ह.भ.प देवगोपालजी शास्त्री आडगावकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या नंतर वृंदावन धाम पाल येथिल प.पु.गोपाल चैतन्यजी महाराज यांनि प्रवचणात मनुष्ण जीवनाचा सकारात्मक उपयोग करा, आल्या जन्मी सतसंग व सत्कार्य करूण दान धर्म करा. भारत व विदेशात कथा प्रवचन करणारे शास्त्री स्वामी
गुणसागरदासजी महाराज यांनी प्रवचणात सांगितले की, श्रीरामांचा जन्म ज्यांच्या आर्शिवादाने झाला असे श्रृंगऋषींच्या पवित्र सानिध्यात आज सतसंग सोहळा पार पडत आहे तुम्ही सर्व खुप भाग्यवंत आहात.
कुविचारांचा, कुसंगतचा, अहंकाराचा त्याग करा, सतसंग करा असे त्यांनि सांगितले. यावेळी व्यासपीठावर प.पु.परमानंद महाराज जीन्सी, प.पु.सद्गुरू कोठारी स्वामी चरणदासजी महाराज गुजरात, सावदा स्वामीनारायण मंदिरचे कोठारी मोहण प्रसादजी महाराज, दिव्य प्रकाशजी महाराज जळगाव, तरूणसागर स्वामी महाराज, शिवचैतन्य महाराज पाल, नवनित चैतन्य महाराज पाल, सुभाष महाराज निंभोरा, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्रभैया पाटील, जनसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे, ईश्वर महाराज बलवाडी, नारायण महाराज आदि मान्यवर होते.
या वेळी मुक्ताईनगरचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यक्रमास हजेरी लावली या वेळी जनसंग्राम चे संस्थापक विवेक ठाकरे यांनी बलवाडी येथील शृंगऋषी मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करावा व 'ब' गट तीर्थक्षेत्र म्हणून याठिकाणी ३ कोटी निधी उपलब्ध व्हावा. डीपीडीसी मधून बलवाडी गाव ते संस्थानापर्यंतचा रस्ता आराखड्यात घेऊन सदराचा रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी संत महंतांना वंदन करूण जनतेची सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने दिली आहे मी नक्की प्रयत्न करूण श्रृंगधामचा विकास करील अशी ग्वाही दिली. या वेळी मान्यवरांचे स्वागत संस्थानचे अध्यक्ष भागवत महाजन, संतोष महाजन, माजी जि.प स.विनोद पाटील, बाळु महाराज, पाडूरंग पाटील, विष्णू महाजन, गोलवाडा पत्रकार चंद्रकांत कोळी, भास्कर चौधरी, विवरा येथिल भागवत महाजन, बलवाडी माजी उपसरपंच जितेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले. या वेळी ७ ते ८ हजार भाविक भक्त उपस्थित होते.
दर गुरूवारला या ठिकाणी विषेश महत्त्व असून या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणावर वरदळ असते कामधेनू गाय या ठिकाणचे विशेष आहे.
फोटोत 1) सजीव देखाव्यात हणुमानांना बंदि करून नेतांना लव कुश
2) व्यासपीठावरुन बोलतांना वृंंदावन धाम पालचे प.पु.गोपाल चैतन्यजी महाराज व उपस्थीत संत महंत.
2) उपस्थित संत महंत व भाविक भक्त.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा