Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जानेवारी, २०२०

रिक्षा चालका मध्ये दिसला प्रामाणिक पणा

 


धुळे:प्रतिनिधी: जगामध्ये प्रामाणिक पणाचे अनेक उदाहरणे बघण्यात मिळते असेच एक उदाहरण रिक्षा चालकाचे 
रिक्षात विसरलेली हातातील बॅग रिक्षा चालकाने शहर पोलिस स्टेशन मध्ये आणून दिली. 
श्रीमती वंदना भाऊसाहेब देसले (रा. एकवीरा नगर, नकाणेरोड, देवपूर, धुळे ) हे शनिवारी रिक्षा (क्रमांक एम. एच १५ जेड १७९३) मधून नकाने रोडने रिक्षात बसुन शहा फर्नीचर जवळ उतरले अस्ता  त्यांची बॅग या रिक्षामध्ये विसरली.

त्या मध्ये चार ग्राम वजनाची माळ,  रोख ३० हजार रुपये, आधारकार्डे, पॕनकार्डे व ईतर संबधीत मुळ कागदपत्र असा ऐवज होता. रिक्षा चालक नामे मांगीलाल मनाजी सरक ( रा कॉटन मार्केट मागे प्लॉट नं.३०, रामचंद्र नगर धुळे ) यांनी बॅगे बाबत कोणतीही लालसा न बाळगता त्यांनी ती बॅग शहर पोलिस स्टेशन आणून दिल्या नंतर ती बॅग श्रीमती वंदना भाऊसाहेब देसले यांना देण्यात आली आणि प्रामाणिक पणा दाखविला.

त्याबद्दल रिक्षा चालक मांगीलाल मनाजी सरक यांचा शहर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी त्यांच्या प्रामाणिक पणा बद्द्ल कौतुक करुन सत्कार करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध