Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

शेगाव शहरामध्ये विधवा घटस्फोटीत महिलांचा तीळगुळाचा कार्यक्रम संपन्न




शेगाव:प्रतिनिधी:आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांति मोठ्या प्रमाणात साजरा केला तर या सणांमध्ये महत्त्वाचे म्हणजे सौभाग्यवती महिलांचे लेणे म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम असते कुंकू हे सौभाग्यवती महिला महिलांकरिता असते परंतु 26 जानेवारी रोजी श्री शीतल नाथ महाराज धर्मशाळा येथे एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला 

या कार्यक्रमामध्ये विधवा व घटस्फोटित महिलांना एकत्र आणून समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सौ सुनीता ताई कलोरे यांनी केला तसेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा कार्यक्रम सुद्धा त्या महिलांसोबत साजरा केला तसेच आपण ज्या समाजात राहतो या समाजात त्या महिलांना आणण्याचा प्रयत्न केला 

हा कार्यक्रम पाहून कार्यक्रमाला येणाऱ्या विधवा घटस्फोटीत महिला यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता हा कार्यक्रम आयोजन करून सुनीताताई कलोने यांनी एक समाजातील महिलांना प्रवाहात आणण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवला या उपक्रमाला समाजातील अनेक  आणि नागरिक व महिला प्रशंसा होत 

आहे यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमती सत्यभामा पल्हाडे अध्यक्षा शितलनाथ महाराज महिला भजनी मंडळ श्रीमती सिंधुबाई कलोरे श्रीमती पद्मावती चिंचोळकर श्रीमती वैशाली पिंपळे संध्याकल लोरे कमलबाई मसने अनुसया भुस्कट अर्चना नाव का र सुनिता नावकर शकुंतला घाटोळ सखुबाई मसने तसेच महिला भजनी मंडळ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ सुनिता ताई कलोरे यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध