Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

प्रति, मा.उपविभागीय अधिकारी साहेब/ तहसीलदार साहेब उपविभागीय अधिकारी कार्यालय/ तहसील कार्यालय



अर्जदार:तालुका व शहर पत्रकार संघ

विषय :- खोटी तक्रार देवून शहानिशा न करता पोलिस प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेला 
खंडणीचा गुन्हा मागे घेवून खोटी तक्रार व गुन्हा दाखल करणाNयांवर तात्काळ कार्यवाही 
करणे बाबत.

मा.महोदय,
वरील विषयान्वये आम्ही विनंती करतो की, मलकापूर येथून प्रकाशित होणारे सायंदैनिक मलकापूर आजतक वृत्तपत्राचे संपादक विरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात बुलडाणा अर्बन पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या बोगस गोल्ड लोन प्रकरणाची वृत्ते माहितीच्या आधारे प्रकाशित केली. या संदर्भातच बुलडाणा अर्बन पतसंस्थेनेच दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित आरोपींविरूध्द बोगस गोल्ड लोन प्रकरणीच गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. या बोगस गोल्ड लोन संदर्भात लगातर वृत्तपत्रामध्ये भाग प्रकाशित केल्याने बुलडाणा अर्बनचे लेखापाल मोहन दलाल यांनी सायंदैनिक मलकापूर आजतक वृत्तपत्राचे संपादक विरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांचे विरोधात खंडणीची खोटी तक्रार दाखल केली. या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता बुलडाणा पो.स्टे.चे ठाणेदार कांबळे यांनी गुन्हे दाखल केले.
सदर प्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या वृत्तपत्राची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून या आधी सुध्दा अशाचप्रकारे अनेक पत्रकारांविरूध्द खोट्या तक्रारी देवून व पैशाच्या जोरावर पोलिस प्रशासनास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रकार घडलेले आहेत. 
तेव्हा लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाची मुस्कटदाबी करणाNयांविरोधात तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येवून या प्रकरणी दोषी असलेल्यांविरूध्द कारवाई करण्यात येवून न्याय देण्यात यावा.


प्रतिलिपि 
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा 
मा. जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब बुलडाणा 
मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध