Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
रात्री २ वाजता घडला हा अपघात एक ठार तर एक जखमी
शिरपूर:प्रतिनिधी:मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला धुळेहुन शेंधवाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने जोराची धडक दिली यात आयशरचा क्लिनर ठार झाला असुन तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महार्गावरील हाडाखेड गावाजवळ लासलगाव येथून मुज्जफरपुर बिहार येथे कांदे घेऊन जाणारा ट्रक (यु.पी ८३ बिटी ५६५६ )मध्ये बिघाड झाल्याने ट्रकला रस्त्याच्या बाजुला उभा करण्यात आले होते.रात्री २ वाजेच्या सुमारास धुळ्याहुन शेंधवाकडे भरधाव वेगाने जाणारी आयशर (एम.पी.०९ सीसी ९८७९) ने ट्रकला जोराची धडक दिली.यावेळी आयशर मधील क्लिनर राजु शंकर बामनिया वय २७ वर्ष रा.नयानगर,बालसपुर मध्यप्रदेश याचा अपघातात म्रुत्यु झाला तर आयशर चालक सत्यम शामलाल नायक वय २५ वर्ष रा नयानगर,मध्यप्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. चालकावर सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा