Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
कुरकटेश्वर महादेव मंदिरात श्रीमदभागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ
कुरखळी: प्रतिनिधी:योगेश्वर मोरे
रामनाम प्रचारक प पू संत श्री तारादासजी बापू यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने कुरखळी ता. शिरपूर येथे मकरसंक्रांत निमित्त दि ९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान श्रीमदभागवत महापुराण कथेचे नियोजन दुपारी २ ते ५ वाजेला सर्व
कुरखळी ग्रामस्थ व सर्व जय सियाराम भक्त परिवाराकडून करण्यात आले असून यासह रामधून, कळस शोभा यात्रा, यज्ञ हवन, सत्संग प्रवचन, कीर्तनाचे, नियोजनही करण्यात आले आहे, महाप्रसादाचे नियोजन दररोज सकाळी ११ ते दुपारी १ . ३० व संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असेल.
दि १३ जानेवारीच्या रात्रीची किर्तनरुपी सेवा समाज प्रबोधनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज माळी यांचे वाणीतून ऐकण्याचे भाग्य कुरखळी सह शिरपूर, सावळदे, पिंप्री व परिसरातील भाविक भक्तांना मिळाले.
यावेळी प्रभोदन करतांना महाराजांनी विशेषतः व्यसनमुक्ती, व संस्कार या विषयावर भर देत हास्यकल्लोळ करीत उपस्थितांना रामनामाच्या भजनात विलीन करून मृदंगाच्या तालावर भक्तिभावाने नाचायला लावले.
तसेच आज दि १४ जाने रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत प. पू. संत श्री तारादासजी बापू यांचे सत्संग प्रवाचनाचा लाभ घेता येईल. दि १५ सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत पूर्णाहुती, आशीर्वचन, गोपाळकाला, व आरती संपन्न होईल.
सर्व शिरपूर सह परिसरातील भाविक भक्तांना प्रवचन, रामधून, यज्ञ हवन, महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन जय सियाराम भक्त परिवार कुरखळी व परिसरातील भाविक भक्तांनी केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा