Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
तालुका पोलीसांनी केली वेल्हाणे गावातील शिवारात 52 हजार 310 रुपयांचा अवैध मद्यसाठा व कार जप्त
तालुका पोलीसांनी केली वेल्हाणे गावातील शिवारात 52 हजार 310 रुपयांचा अवैध मद्यसाठा व कार जप्त
धुळे :प्रतिनिधी:तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना खबरीमार्फत गोपनिय माहिती मिळाली.
त्या आधारे पोलीसांनी एक पथक तयार करुन तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे वेल्हाणे गावातील शिवारात पोहचले तिथे जवळपास शोधाशोध केली असता, काटेरी झाडाच्या आडोशाला लावलेली बेवारस स्थितीत उभी करुन ठेवलेली एक इंडिको कार क्रं.एम. एच. 18 / एक्स 111 हि दिसली.
त्या ठिकाणी येणारे जाणारे यांना विचारपूस केली असता माहिती नाही असे काही नागरीकांनी पोलीसांना सांगितले. पोलीसांनी गाडीची तपासणी केली असताना गाडीच्या डिक्कीत पुठ्याच्या खोक्यात व प्लास्टिक गोणीत –
1) टँगो कंपनीची देशी दारुच्या 230 नग बाटल्या किंमत 11960
2) मॅक डोवेल्स कंपनी विदेशी दारुच्या बाटल्या 185 नग किंमत 27750
3) इंपेरीयल ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारुच्या बाटल्या 90 नग एकुण 12600 रुपये
4)इंडिको कार किंमत 1 लाख रू.
असा एकुण 152310 रुपयांचा माल विना परवाना कब्जात बाळगतांना मिळुन आल्या प्रकरणी एका जणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एक फरार झाला आहे.
सगळा माल तालुका पोलीसांनी जप्त करुन तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून . सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, ग्रामिण उपविभागिय अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे,तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप गांगुर्डे, संजय साळवे, जितेंद्र सोनार, सुनिल जावरे, अमोल कापसे, राकेश शिरसाठ, हेमंत बोरसे, वानखेडे यांनी केली आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा