Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
रावेर वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार यांना महाराष्ट्र बंदचे निवेदन सादर
प्रतिनिधी:रावेर दि. २४ (प्रतिनिंधी) येथे
आज दि. २४ जानेवारी शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे महाराष्टातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना आणी कामगार संघटनाच्या वतीने सी.ए.ए.,एन आर सी व एन आर पी आणी भारत सरकारच्या आर्थीक दिवाळखोर विरोधात व निर्गुतणूक धोरण विरोधात आज दि २४ जानेवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला.
रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ याचे तर्फे रावेर नायब तहसिलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.
या बंदला रावेर तालुका कॉग्रेस पक्ष, ऑल इंडिया मसजिद ए इलेहादुल मुस्लीमिन ,रावेर तसेच मुस्मीम पंच कमेटी रावेर यांचा जाहिर पाठींबा आहे.
वरील निवेदनावर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे,कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,मुस्लीम पंच कमिटीचे शे.गयास शे.रशिद एम.आय.एम.चे शे. वसिम, राजुभाऊ खिरवडकर,नुरा तडवी,वचितचे सुरेश अटाकाळे,मा. नगरसेवक महेंद्र गजरे,वंचितचे बाळा शिरतुरे,राहुल डी.गाढे, विनोद तायडे, अशोक शिरतुरे, दौलत अढांगळे, नितीन तायडे, भिमराव तायडे, सै.आरिफ
सै.मोहम शे. नासिर शे. कालु, शे.रफीक,गौतम अटकाळे, इसुफ खान, विकास सवर्णे, शे. जावेद ,रविंद्र भिल्ल,यांच्यासह असंख्ये बहुजन कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा