Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे येथील एस.व्ही.के.एम. स्कूल मध्ये “स्वप्न”थीम वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठया दिमाखदार स्वरुपात संपन्न, बालकलाकारांचे कलाविष्कार,
धुळे येथील एस.व्ही.के.एम. स्कूल मध्ये “स्वप्न”थीम वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठया दिमाखदार स्वरुपात संपन्न, बालकलाकारांचे कलाविष्कार,
"तारक मेहता का उलटा चष्मा" मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची शिरपूर व धुळे येथे खास उपस्थिती
शिरपूर:प्रतिनिधी:धुळे येथे श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूल मध्ये शुक्रवारी दि. 24 जानेवारी रोजी “स्वप्न” या थीम वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठया दिमाखदार स्वरुपात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण "तारक मेहता का उलटा चष्मा" या प्रसिद्ध मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची उपस्थिती होती.
सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी हे शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी मुंबई येथून इंदूर विमानतळावरील येतील. तेथून कारने प्रवास करून शिरपूर येथे मुकेश पटेल मिलिटरी स्कूल, मुकेश पटेल सीबीएसई स्कूल, सावळदे येथील एस. व्ही. के. एम., एन. एम. आय. एम. एस. शिरपूर कॅम्पस ला सदिच्छा भेट देऊन श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या शैक्षणिक कार्याला मनापासून दाद दिली.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध असल्याने जेठालाल हे शिरपूर येथे आले.
शिरपूर येथून एस. व्ही. के. एम. संस्थेला सदिच्छा भेट देवून झाल्या नंतर त्यांनी धुळे येथे एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूल च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सायंकाळी उपस्थिती येवून सर्व बालकलाकार यांचे कौतुक केले.
सुंदर वेशभूषा, नटून थटून आलेले बालकलाकार, भव्य रंगमंच, अप्रतिम लाईटींग व्यवस्था, अतिशय सुंदर बैठक व्यवस्था, पालकांची ठेवलेली सन्मानपूर्वक व्यवस्था........अशा सर्व सुनियोजित व्यवस्था व कार्यक्रमामुळे सर्वांचे डोळयांचे पारणे फिटेल असा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार दिलीप जोशी उर्फ जेठालाल, शिरपूर नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, धुळे येथील न्या. शेख, संस्था सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, अडिशनल एस. पी. राजू भुजबळ, धुळे तहसीलदार किशोर कदम, डाएट प्राचार्य डॉ. विद्या पाटील, मुंबई ट्रस्टी राजुभाई शाह, ट्रस्टी भार्गवभाई पटेल, संस्था व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुंबई येथील सी. एन. एम. स्कूल डायरेक्टर गिरजा मोहन, योगेश भंडारी, गोपाल भंडारी, रिटाबेन पटेल, राहुल दंदे, सुभाष कुलकर्णी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापिका सुनंदा मेनन तसेच शिरपूर व धुळे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नटरंग व श्री गणरायाचे पूजन करण्यात येवून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
गिरजा मोहन यांनी धुळे येथील एस व्ही के एम सीबीएसई स्कूलच्या प्रगती बद्दल आनंद व्यक्त केला. या शाळेला जागतिक पातळीवरील सुविधा उपलब्ध करत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल सविस्तर विवेचन केले. शाळेत गुणवत्तेला प्राधान्य दिले जावून आंतरराष्ट्रीय स्तरावरील “स्मार्ट विद्यार्थी” घडविण्यासाठी अध्यापनाचे काम सुरु आहे असे सांगितले.
अतिशय सुंदररीत्या सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
अनेक प्रकारच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, विविध नृत्याविष्कार सादर करुन तसेच अनेक कलागुणांचे दर्शन घडवून प्रेक्षकांची मने जिंकली. विविध संगितमय साथ देत विद्यार्थ्यांनी विविध गीतगायन व नाटीकांचे सादरीकरण केले. नर्सरी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले. प्रेक्षकांनी बालकलाकारांच्या सर्वच कार्यक्रमांना टाळयांनी भरभरुन दाद दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा