Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जानेवारी, २०२०
ग्राम पंचायत खातखेड येथे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी:मौजे खातखेड बोंडगाव येथील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमा ला गावातील सरपंच तथा शिवसेना तालुका उपप्रमुख श्री रामेश्वर थारकर यांनी झेंडावंदन केले व अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना पोशाख वाटप
केले, विद्यार्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमा द्वारे स्वच्छता,आरोग्य विषयक उपक्रमाद्वारे गावकर्यांना संदेश दिला गावातील ग्रामपरिवर्तक श्री प्रविण भवटे यांनी
शोषखड्डे बद्दल माहिती देत,गाव सांडपाणी मुक्त करने जलपुनर्भरण रेन वाटर हार्वेस्टिंग,ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावातील उपलब्ध संरचनाचे पुनर्जीवन आजुबाचा परिसर स्वच्छ करणे , साफसफाई करणे , स्वखुशीने श्रमदानातुन माझंगाव : स्वच्छ - सुंदर - हारित व जलसुरक्षीत गाव पाणी , स्वच्छता , आरोग्य , पर्यावरण , सामाजिक परिवर्तन , शाश्वत कृषी विकास , गुणवत्तापूर्ण शिक्षण , पोषण ,अश्या विविध उपक्रम व होत
असलेल्या कामाची माहिती दिली यावेळी सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, CRP , सर्व शाळेचे मुख्याध्यापक तसेच सहशिक्षक ,महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सचिव, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस , ग्रामसेविका, तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा