Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

मलकापूर वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित केल्याने खोटी तक्रार देवून तसेच कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी वृत्तपत्राचे संपादक व उपसंपदाका विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल



प्रतिनिधी: मलकापूर वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित केल्याने खोटी तक्रार देवून तसेच कोणतीही शहानिशा न करता पोलिसांनी वृत्तपत्राचे संपादक व उपसंपदाका विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीत लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाची मुस्कटदाबी करण्याच्या केलेल्या या प्रकाराचा मलकापूर तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करीत याप्रकरणी दोषी असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज २० जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर येथून प्रकाशित होणारे सायंदैनिक मलकापूर आजतक वृत्तपत्राचे संपादक विरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांनी यांनी त्यांच्या वृत्तपत्रात बुलडाणा अर्बन पतसंस्थेमध्ये सुरू असलेल्या बोगस गोल्ड लोन प्रकरणाची वृत्ते प्रकाशित केली. या दरम्यानच्या काळात याच प्रकरणी बुलडाणा अर्बन पतसंस्थेनेच दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित आरोपींविरूध्द बोगस गोल्ड लोन प्रकरणीच गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. 

सदर प्रकरणाची वृत्ते प्रकाशित केल्याने बुलडाणा अर्बनचे लेखापाल मोहन दलाल यांनी सायंदैनिक मलकापूर आजतक वृत्तपत्राचे संपादक विरसिंह राजपूत व उपसंपादक राजेश इंगळे यांचे विरोधात खंडणीची खोटी तक्रार दाखल केली. 

या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता बुलडाणा पो.स्टे.चे ठाणेदार कांबळे यांनी गुन्हे दाखल केले. सदर प्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या वृत्तपत्राची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असून या आधी सुध्दा अशाचप्रकारे अनेक पत्रकारांविरूध्द खोट्या तक्रारी देण्याचे प्रकार सुध्दा घडलेले आहेत. तेव्हा लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाची मुस्कटदाबी करणाNयांविरोधात तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत या प्रकरणी दोषी असलेल्यांविरूध्द तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.


निवेदनावर पत्रकार गुलाबराव गावंडे, रमेश उमाळकर, गजानन ठोसर, नंदकिशोर वर्मा, हरीभाऊ गोसावी, हनुदान जगताप, अतुल होले, विश्वनाथ पुरकर, विलास खर्चे, सुधाकर तायडे, नितीन पवार, किशोर सोनोने, अजय टप, प्रविण राजपूत, सुनिल देशमुख, श्रीकृष्ण तायडे, विनायक तळेकर, श्रीकृष्ण भगत, बळीराम बावस्कर, समाधान सुरवाडे, विजयकुमार वर्मा, गौरव खरे, श्रावण पाटील, उल्हास शेगोकार, सतीष दांडगे, भागवत पाटील, नथ्थुजी हिवराळे, अशोक रवणकार, हिरा आसलकर यांचेसह आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षNया आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध