Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पदासाठी सौ. मोगरा जयवंत पाडवी यांची शिरपूर तालुक्यातून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव




शिरपूर:प्रतिनिधी:माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पदासाठी सौ.मोगरा जयवंत पाडवी यांची शिरपूर तालुक्यातून नियुक्ती करण्यात आली. शिरपूर येथे पोहचल्यावर मिरवणूक काढण्यात आली. तसेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.


जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सभापती निवडीसाठी धुळे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ एनएमआयएमएस कॅम्पस मध्ये भारतीय जनता पार्टी च्या सर्व नेत्यांची मंगळवारी दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.

या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, खा. सुभाष भामरे, खा. हिनाताई गावित, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष सौ. निकम,

कामराज निकम, सुरेश पाटील, सुभाष देवरे, संजय शर्मा,अनिकेत पाटील, किशोर सिंघवी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित सर्व सभापती यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धुळे एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये सत्कार करण्यात आला.


या बैठकीत सर्वानुमते समाज कल्याण सभापती पदासाठी शिरपूर तालुक्यातील पळासनेर गटातील मोगरा जयवंत पाडवी रा. उमर्दा तालुका शिरपूर यांचे नाव निश्चित केले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 40 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला.

या निवडीबद्दल शिरपूर येथे जनक विला निवासस्थानी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते सौ. मोगरा जयवंत पाडवी यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, माजी पंचायत समिती उपसभापती जगन पावरा, अशोक कलाल, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध