Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

चिनावल नवनाथ मंदिरात धर्मबीजला एक दिवसीय सामुहिक नवनाथ पारायण.




प्रतिनिधी:रावेर:चिनावल ता.रावेर येथे अतिशय जागृत श्री नवनाथ महाराज यांच्या मंदिरावर धर्मनाथबीज निमित्त एकदिवशीय नवनाथ पारायण सोहळा जळगांव जिल्हा परिसर व विदर्भ येथून असंख्य भाविकांनी सेवा रूजू केली 

या सेवेसाठी प्रत्यक्ष पारायण साठी ५३३०  स्वामी समर्थ सेवेकरी भक्त यांनी सेवा केली व पारायण करणाऱ्या भक्तांना जागेवरच पाणी, चहा , फराळ इ सेवा देण्यासाठी चिनवाल येथील परिसर  ७०० सेवेकरी यांनी पारायण करणाऱ्याना सोयी सुविधा दिल्यात उपस्थितींनी चिनावल नवनाथ मंदिराचे निर्माते व ज्यांच्या मूळे या सर्व सेवा करण्याची संधी मिळाली असे आदरणीय शरद दादा बोरले यांच्या स्वपत्नीक सत्कार चिनावल स्वामी समर्थ केंद्र संचालक आदरणीय बाळू सर(विश्वनाथ पाटील ) यांनी सर्व भाविकांच्या वतीने स्वपत्नीक सत्कार करून आभार मानले कारण या  जागृत स्थानावर इतकी ऊर्जा आहे 

की जवळ पास १६४ भाविकांनी पारायणसाठी जवळ ठेवलेले नारळ आपोआप फुटले त्यामुळे दोष बाधा या सर्व या ठिकाणी सेवा केल्याने मिटतात असा अनेकांना अनुभव ७ वर्षांपासून येत आहे व पारायण करताना खूप मोठी दैवी शक्ती अस्थीत्वाची जाणीव भक्तांना आली खुप शांततेत पारायण झाले वाचकांनी सुद्धा खूप लय बद्ध सर्वाना समजेल अशा पद्धतीने वाचन केले पारायण सुरू असताना भक्त इतके वाचनात मग्न झाले होते 

आरतीनंतर उपस्थितांना महाप्रसाद लाभ सुद्धा घेतला व अशीच सेवा पुन्हा पुन्हा आयोजकांनी आमच्या कडून करून घ्यावी अशी स्वामी
चरणी नवनाथ चरणी प्रार्थना केली.

फोटोत:- 1) पारायणण करतांना स्वामी भक्त.
2) आरती करतांना स्वामी भक्त.
3) शरद बोरोले यांचा सपत्नीक सत्कार करतांना स्वामी भक्त.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध