Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

अभय माध्यमिक विद्यालय,धुळे येथे स्काउट गाईड मेळावा संप्पन्न






धुळे:प्रतिनिधी:धुळे येथील अभय युवा कल्याण केंद्र,धुळे संचलित अभय माध्यमिक विद्यालयाचा स्काउट गाइड मेळावा निसर्ग रम्य वातावरणात संप्पन्न झाला.
स्काउट गाईडचे संस्थापक जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल व गाईड च्या जनक लेडी बेडन पाॅवेल यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध नैसर्गीक वातावरणातील अभ्यास,प्राण्याच्या ठस्यांच्या ओळखीने माग ओळखणे,नदी,नाले,जंगल यातील विविध नैसर्गीक घटक यांच्या माध्यमातुन तंबु सजावट करणे,भांड्याविना स्वयंपाक करणे,विविध खाद्य पदार्थ स्वताला बनवुन पोट भरता यावे.दोरींच्या गाठींचे प्रकार,स्कार्फ बांधणे,यासह स्काउट वचन,स्काउट नियम,स्काउटच्या विविध गितांच्या चाली.रांगोळी यातुन शालेय अभ्यासक्रमातील प्रथम सोपान व्दितीय सोपान,तृतीय सोपान हा अभ्यासक्रम ईयत्ता 8वी,9वी,10वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्काउट गाईड अभ्यासक्रमातुन शिकण्यासाठी मिळतो.


हा उत्कृष्ठ कॅम्प चे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मनिष धात्रक,यांच्या मार्गदर्शनाने आयोजीत करण्यात आला.स्काउट प्रमुख श्री.बाविस्कर आर.टी,श्रीमती पाटील एस.बी,श्री.बोरसे.एस.एल,श्रीमती.थोरात मॅडम,श्री.पाटील एम.ए.श्रीमती.पाटील एन.एन,यांनी स्काउटचे वचन,नियम,गाठी अध्यापन केले.पांझरा नदी किनारी शेतात हा स्काउट कॅम्प झाला.प्रथम स्काउट जनक लाॅर्ड बेडन पाॅवेल व गाईड जनक लेडी बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमा पुजन मुख्याध्यापक मनिष धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले व स्काउट ध्वज फडकवण्यात आला.यावेळी पाक क्रृती व तंबु सजावटीचे परिक्षण प्रा. सुनिल पवार.प्रा.बोरसेएस.एस.प्रा.व्हि.एम.पाटील,प्रा.शिंदे सर,प्रा.बागुल सर,यांनी केले.उत्कृष्ठ तंबु सजावट व पाक कलेचे प्रथम व्दितीय क्रमांक येणार्‍या संघांना बक्षिस वाटप झाले.

आलेल्या मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.आढावे एन.बी.यांनी केले.सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती.पाटील व्हि.डी.यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व सविस्तर प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एम.ए.पाटील यांनी केले.उत्साहात हा स्काउट कॅम्प संप्पन्न झाला.यात 75 विद्यार्थी स्काउट म्हणून तर 80 विद्यार्थीनी गाईड म्हणून या स्काउट कॅम्पचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध