Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

चाळीसगाव रोड पोलिसांनी गांजा व दुचाकी असा एकून 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल केला जप्त




धुळे:प्रतिनिधी:दुचाकीवर गांजाची वाहतूक करताना चाळीसगाव पोलीसांनी शिरपुरातील एकाला अटक केली आहे. कैलास गुलाब बेलदार (वय 34, रा. कळमसरे, ता.शिरपूर, जिल्हा धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव रोड पोलीसांना एक व्यक्ती दुचाकीवरून शिरपूरहुन मालेगावकडे गांजाची गोणी घेऊन जात असल्याची खबरीकडुन माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे त्यांनी ही माहिती सपोनि सारिका कोडापे यांना दिली. पोलीसांनी एक पथक तयार करुन चाळीसगावरोड चौफुलीवर मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता शिरपूरहुन एक विना नंबर प्लेट ज्युपिटर चौफुलीकडे येताना दिसली. 

पोलीसांनी दुचाकी थांबवून वाहनाची तपासणी केली असता त्याचे जवळ पांढऱ्या रंगाच्या दोन गोणीत 16 किलो 984 ग्रँम गांजा सापडला. एकून 65 हजार रुपयांचा गांजा विक्री करण्याच्या बहाण्याने जवळ बाळगून व अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याप्रकरणी त्याला दुचाकीसह पोलीसांनी ताब्यात घेतले. गांजा व दुचाकी असा एकून 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध