Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०
मा.अध्यक्ष हयातखान "खादिमे मिल्लत" पुरस्काराने सम्मानित
रावेर: प्रतिनिधी:समाजिक क्षेत्रात महत्वाचे तसेच उल्लेखनीय कार्य करणारे, गोरगरीबांना नेहमी विशेष मदत करणारे, चिनावल मुस्लिम पंच कमिटी व खिज़र एज्युकेशनल अँन्ड वेलफेअर सोसायटी चिनावलचे अध्यक्ष मा. हयातखान हाजी वाहेदखान यांना नुकताच खिदमते मिल्लत फाउंडेशन फैजपूर ता. यावल तर्फे आदर्श समाज सेवक जीवन गौरव खादिमे मिल्लत पुरस्काराने मा. आमदार शिरीष मधुकराव चौधरी यांचे हस्ते महात्मा गांधी बहुउद्देशीय हॉल फैजपूर येथे सम्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार शिरीष मधूकरराव चौधरी होते. दिपप्रज्वलन इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शोएब मोहम्मद खान, मौलाना शरीफ अहमद अंसारी व मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक संस्था अध्यक्ष मुदस्सर नज़र यांनी सादर केले. सुत्रसंचालन हारुन उस्मानी भुसावळ तर आभार सय्यद फारुक यांनी केले.
सम्मान सोहळाव्यात रावेर आणि यावल तालुक्यात एकूण 22 मान्यवरांना विविध क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल सम्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्था उपाध्यक्ष असलमखान, चेअरमन शेख हसन मिस्तरी, व्ह.चेअरमन शेख निसार, सचिव शरीफ खान, सहसचिव शेख मुस्तकिम, संचालक शेख कलीम मेंबर, शेख गफुर मेंबर, शेख अबरार, शेख जावेद, मुस्लिम पंच कमेटीचे सर्व सदस्यांनी तसेच खिज़र शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा