Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑगस्ट, २०२६
शिरपूर आगारात ‘राजमाता जिजाऊ बससेवे’चे लोकार्पण उत्साहात संपन्न
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ बससेवे’चा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन शिरपूर आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमास शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम (दादा) पावरा, शिरपूर-वडाळे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. संगीता ताई देवरे, शिवसेना तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, प्रसाद पाटील, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी दीप वंजारा, डीटीएस सुनील महाले, स्थानक प्रमुख मनोज पाटील, गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के. बांबरे, बाबूजी शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार काशीराम (दादा) पावरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ बससेवेची विधिवत पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. फीत कापून बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार पावरा यांनी शिरपूर आगारातील अधिकारी, चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रवाशांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीची व सन्मानाची वागणूक द्यावी, सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सेवा पुरविणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी असल्याचे
त्यांनी सांगितले प्रामाणिकपणा, निष्ठा आणि सेवाभाव जपणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव संपूर्ण राज्यात होत असल्याचे नमूद करत त्यांनी शिरपूर आगाराचे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील, स्थानक प्रमुख मनोज पाटील तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रवाशांच्या सेवेसाठी अशीच तत्परता कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे. प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व परिवहन विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही आमदार पावरा यांनी स्पष्ट केले.
या लोकार्पण सोहळ्यास शिरपूर आगारातील अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा