Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
सर्व ठेकेदार उपाशी आणि फक्त वाघचा पार्टनर कुणाल नेरकर तुपाशी अधिकाऱ्यांच्या आयडी पासुन खुर्चीचा ही करतो वापर,
सर्व ठेकेदार उपाशी आणि फक्त वाघचा पार्टनर कुणाल नेरकर तुपाशी अधिकाऱ्यांच्या आयडी पासुन खुर्चीचा ही करतो वापर,
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील इतर पंचायत समितींच्या बांधकाम, दुरुस्ती, फर्निचर अशा सर्वच कामाचा ठेका फक्त कुणाल नेरकरलाच मिळतो,कारण त्याच्या प्रत्येक कामात वाघाचा थेट निम्मे वाटा असतो.सध्याच्या स्थितीत इतर सामान्य ठेकेदारांचे बिले कामे झाल्या नंतर देखील निघत नाहीत,मात्र कुणाल नेरकरची बिले काम होण्यापुर्वीच काही वेळेस काम न होता देखील निघतात. हा सर्वच करिश्मा वाघाचा आहे.सध्या बहुतांश ठेकेदार निधी अभावी उपाशी आहेत.मात्र एकटा कुणाल नेरकर वाघाच्या आर्शिवादाने तुपाशी नव्हे तर गावठी तुपाशी असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
गेल्या दहा ते बारा वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांचे किमान दोन ते तीन वेळेस नुतनीकरण करण्यात आले आहे.प्रत्येक वेळेस फर्निचर बदलण्यात आले आहे.आता ही जिल्हा परिषदेत फेरफटका मारला तरी कोणत्या तरी विभागात दुरुस्तीचे काम सुरुच असेल,गेल्या दहा ते बारा वर्षात वाघांच्या सुपिक डोक्यातुन अधिकाऱ्यांना कमाईचा दाखविलेल्या रस्त्यामुळे जेवढा निधी जिल्हा परिषदेच्या इमारतीत दुरुस्ती आणि नुतनीकरणावर खर्च झाला आहे.तेवढ्या पैश्यांमध्ये जिल्हा परिषदेची टोलेजंग इमारत दोन वेळेस उभारता आली असती.मात्र तसे केल्या नंतर वाघाचे अस्तित्व धोक्यात आले असते आणि कुणालला वाढवता आले नसते म्हणुन फक्त दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे.
कुणाल कडे अधिकाऱ्यांच्या चाब्या-
कुणाल नेरकर हा खासगी ठेकेदार आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर कुणाल बसण्याचा अधिकार नाही.मात्र असे असले तरी कुणाल स्वत:च बांधकाम विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर बसुन संगणकात ई स्वाक्षरीचा वापर करुन स्वत:च्या सर्व फाईल स्वत:च क्लिअर करुन घेतो.विशेष बाब म्हणजे बांधकाम विभागातील शाखा अभियंता,उपअभियंता,कार्यकारी अभियंता,मुख्य वित्त व लेखा अधिकारी,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अशा सर्वच अधिकाऱ्यांचे आयडी आणि पासवर्ड देखील कुणाल नेरकरला माहिती आहेत.त्यामुळे त्याच्या फाईल अडकुनच पडत नाहीत.कुणाल नेरकर कडून मिळणाऱ्या आर्थीक लाभाच्या लालसेने अधिकारी भविष्यातील मोठ्या गैरव्यवहारालाच पाठबळ देत आहेत.
कुणाल व्यतरिक्त अन्य ठेकेदाराला वावच नाही-
वाघ आणि नेरकर यांचे जणु काही लिव्ह इन रिलेशन सारखी पार्टनरशीप गेल्या काही वर्षात प्रचंड बहरलेली आहे.नव्याने कोणी अधिकारी हजर झाला तर वाघ सोबत नेरकर तिथे हजरच असतो.त्यामुळे अधिकाऱ्यांची लगेच मेहरनजर होते.परिणामी जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुणाल व्यतरिक्त कुणालाच संधी मिळत नाही.कुणालच्या कामचा दर्जा देखील सुमार असतो,जेणे करुन लगेच थोड्या दिवसात नविन काम करण्याची संधी मिळते.जर कुणाल नेरकरने गेल्या दहा वर्षात जिल्हा परिषदेत केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले तरी कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचे सिध्द होईल.
नव्या सीईओच्या सेवेत रममाण-
आधुनिक धर्मभास्कर आणि कुणाल नेरकर हे नव्याने रुजु झालेल्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या सेवेवर विशेष भर देत आहेत.जेणे करुन साहेबांची मेहरनजर त्यांच्यावर रहावी.त्यामुळे सध्या तरी कोणी सीईओ साहेबांकडे वाघ आणि नेरकर या जोडी बद्दल काही बोलले तरी होणार नाही.मात्र कर्तव्यनिष्ठता दाखवित साहेबांनी वाघ आणि नेरकर कडून दररोज जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर टाकण्यात येणाऱ्या दरोड्यावर आळा घालावा ही अपेक्षा.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा