Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
आमदार अनिल पाटील यांच्या मध्यस्तीने पंकज पाटील यांचे प्रजासत्ताक दिनी असलेले उपोषण तूर्तास मागे
आमदार अनिल पाटील यांच्या मध्यस्तीने पंकज पाटील यांचे प्रजासत्ताक दिनी असलेले उपोषण तूर्तास मागे
BY ऑनलाईन तरुण गर्जना
२५ जानेवारी २०२०
शिवाजी पारधी (प्रतिनिधी)
अमळनेर तालुक्यातील
गैरकारभार करून स्वस्त धान्य मालाचा अपहार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर गुन्हा दाखल
करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते वृक्ष मित्र पंकज पाटील यांनी तहसील
कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
भुमीपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.आमदार अनिल
पाटील यांनी पंकज पाटील यांच्या तक्रारीवरून
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे
अमळनेर तालुक्यातील रेशन गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदार व कर्तव्यात कसूर
करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली असून त्यानुसार
कारवाई प्रस्तावित आहे.
तालुक्यातील रेशन गैरकारभाराबाबत ते विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार असून लवकरच
सर्वसाधारण जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.या संपूर्ण गैरकारभाराची
चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपोषण कर्त्यांना दिले.त्यामुळे
पंकज पाटील यांनी प्रशासनाला सहकार्य करत तूर्तास उपोषण मागे घेतले आहे.
याप्रसंगी अमळनेरचे
तहसिलदार मिलिंद वाघ ,पीआय अंबादास मोरे ,श्याम बापू ,मनोज पाटील ,गोकुळ माळी ,सुकलाल पारधी हे उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा