- सरपंच यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई
- ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंग कार्यवाही करण्याचा इशारा .
Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
हागणदारी मुक्त गांव करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपात्रतेची व शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशारा : गटविकास अधिकारी
हागणदारी मुक्त गांव करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपात्रतेची व शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशारा : गटविकास अधिकारी
BY ऑनलाईन तरुण गर्जना
२५ जानेवारी
२०२०
पंकज पाटील (उपसंपादक)
अमळनेर तालुक्यात
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १ डिसेंबर २०१९ पासून हागणदारी मुक्त अमळनेर अभियान राबविण्यात
येत आहे .अमळनेर तालुक्यात हे अभियान राबविण्यासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी
जीव तोड मेहनत करत असून त्यांच्या या अभियानाचे तीन तेरा करण्याचे काम तालुक्यातील
काही ग्रामपंचायती करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.
तालुक्यातील जुनोने , पातोंडा ,निम ,तरवाडे ,ढेकू सीम या
गावांतील सरपंच ,ग्रामसेवक हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता नियमांची
पायमल्ली करत असल्याचे गटविकास अधिकारी
यांच्या लक्षात आले आहे. तालुक्यातील सर्व गावांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयांसाठी अनुदान
देवून देखील सार्वजनिक जागेवर लोक उघड्यावर बसलेले गटविकास अधिकारी यांना आढळून
आलेत .त्यानुषंगाने त्यांनी जुनोने, पातोंडा ,निम ,तरवाडे ,ढेकू सीम येथील सरपंच यांच्यावर
ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) नुसार व ग्रामसेवक यांच्यावर
महाराष्ट्र जिल्हा सेवा व शिस्त अपील १९६४ चे कलम ३ अंतर्गत शिस्तभंग विषयक
कारवाई करण्याचा इशारा दिला आहे . येत्या तीन दिवसांत येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी
उघड्यावर शौचालयाला बसणाऱ्यांचा पायबंद न केल्यास कारवाईला सामोरे जाण्याची ताकीद
दिली आहे.
तालुक्यात गटविकास
अधिकारी यांनी आतापर्यंत १०५ लोटाबहाद्दर
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अमळनेर
तालुक्यात प्रथमच असा कर्तव्यदक्ष व ध्येयाने प्रेरित गटविकास अधिकारी लाभला असून
त्यांच्या या धडाकेबाज कार्यवाहीने त्यांच्याच काही हलगर्जी कर्मचा-यांना धडकी भरली आहे. तर स्थानिक आमदार
यांच्याकडून त्यांचे कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा